पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून 'या' नावावर शिक्कामोर्तब!

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून 'या' नावावर शिक्कामोर्तब!

राष्ट्रवादीकडून अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदासाठी कुणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता होती.

  • Share this:

पुणे, 11 जानेवारी : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. कारण या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला स्वबळावर बहुमत आहे. अशातच राष्ट्रवादीकडून अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदासाठी कुणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता होती. अखेर ही नाव जाहीर करण्यात आली आहेत. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून निर्मला पानसरे आणि उपाध्यक्षपदासाठी रणजित शिवतारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

यंदा पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या काल शुक्रवारी मुलाखती घेतल्या होत्या. अध्यक्षपदासाठी एकूण 17 महिला इच्छुक होत्या.

राष्ट्रवादीतून कोण होतं इच्छुक?

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत मोठी स्पर्धा होती. मावळमधून शोभा कदम, फुरसुंगीमधून अर्चना कामठे, शिरूरमधून मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल, सुजाता पवार, स्वाती पाचुडंकर, खेडमधून निर्मला पानसरे यांच्यात अध्यक्षपदासाठी तीव्र स्पर्धा होती. मात्र अखेर अजित पवार यांनी निर्मला पानसरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

पुणे झेडपी पक्षीय संख्याबळ

एकूण 75

राष्ट्रवादी 42(3)सहयोगी

शिवसेना 14

काँग्रेस 7

भाजप 7

रासप 1

रिक्त 1(रोहित पवार)

दरम्यान, सध्या राज्यभर जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हे तीन पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: NCPpune
First Published: Jan 11, 2020 01:11 PM IST

ताज्या बातम्या