अडीच लाख तांदळाच्या दाण्यांवर रामनाम, नववीतील विद्यार्थ्यांचा विक्रम

अडीच लाख तांदळाच्या दाण्यांवर रामनाम, नववीतील विद्यार्थ्यांचा विक्रम

पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात राहणाऱ्या आकाशने अनोखा विक्राम केला आहे. त्याने सुमारे अडीच लाख तांदळाच्या दाण्यांवर राम नाम लिहिलं आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 12 फेब्रुवारी - रावणाच्या लंकेत समुद्रमार्गे जाताना वानर सेनेनं दगडावर श्रीराम लिहून सेतू उभारल्याची आख्यायिका तुम्ही ऐकली असेल. ही गोष्ट रामायणातील आहे. हजारो वर्षा नंतर असाच काहीसा अनोखा प्रयोग एका विद्यार्थ्यांनं केला आहे. ज्याची दखल चक्क हाय रेंज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डने घेतली आहे. मात्र यावेळी राम नाम दगडावर नाही तर चक्क तांदळावर लिहिण्यात आलं. आणि हो तेही एक दोन नव्हे तर सुमारे दिड लाख तांदळाच्या दाण्यांवर राम नाम लिहिण्यात आलंय.

आणि ही नाजुक कलाकृती पिंपरी-चिंचवड शहरातील दिघीमधील आकाश बाजदने केली आहे.

दिघी परिसरात राहणाऱ्या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आपल्या अनोख्या छंदाने आपल्या नावाप्रमाणे आकाशालाच गवसणी घातली आहे. आकाशला तांदळाच्या दाण्यांवर राम नाम लिहण्याचा छंद जडला आणि त्याच्या नकळत त्याच्या या छंदाच रूपांतर चक्क विक्रमात झालं आहे.

आकाशने हा विक्रम जरी साध्य केला असला तरी त्याच्या वडिलांची त्याला मोलाची साथ लाभली आहे. त्याचे वडिल गजानन यांनी आकाशला दुर्बिनीशिवाय तांदळावर विविध रंगांमध्ये रामनाम कसं लिहायचं याचं मार्गदर्शन केलं.

दोन ते अडीच महिन्यांचे अथक परिश्रम घेतल्यानंतर या मेहनती विध्यार्थ्याने तब्बल दीड लाख तांदुळाच्या दाण्यावर राम लिहित नवीन विक्रम केला आहे. या कामगिरीने आज आकाशच्या नावाची 'हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'इंक्रेडेबल बुक' मध्ये नोंद झाली आहे.

या विक्रमानंतर वंदे मातरम किंवा राष्ट्रगीत तांदळावर लिहिण्याचा त्याचा मानस आहे. अर्थातच भाताची परीक्षा शितावरून केली जाते या म्हणीनुसार आकाशचा हा विक्रम बघता पुढेही तो त्याला हवा तो विक्रम सहज करेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कोरोना व्हायरसमुळे राजमाच्या किंमतीत वाढ, काय आहे संबंध?

इंदुरीकर महाराज आपल्याच किर्तनामुळे अडचणीत, होणार गुन्हा दाखल

 

First published: February 12, 2020, 12:46 PM IST

ताज्या बातम्या