निलेश राणे आणि संजय काकडेंनी थकवली तब्बल 83 लाखांची पाणीपट्टी, पुणे पालिकेनं बजावली नोटीस

पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) 200 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविणाऱ्या 856 जणांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली

पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) 200 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविणाऱ्या 856 जणांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली

  • Share this:
पुणे, 15 जून : पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) 200 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविणाऱ्या 856 जणांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या यादीत भाजपच्या दोन माजी खासदारांची नावे असून अनेक नामांकित शिक्षण संस्था सरकारी कार्यालय आणि बिल्डरचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.  त्यामुळे आता वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून नोटीस बजावली आहे. पाणीपट्टी थकवणाऱ्यांच्या यादीत भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि संजय काकडे (Sanjay kakade) या भाजपच्या माजी खासदारांसह अनेक नामांकित आणि त्यांच्याशी संबंधित संस्था इमारती यांचा समावेश आहे. खासगी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या कनेक्शनच्या थकबाकीने दोनशे कोटींचा आकडा गाठला आहे. आकडेवारीच्या माध्यमातून पाहुयात कशी आहे थकबाकी आणि कोण आहेत हे थकबाकीदार? एक कोटी पेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्याची संख्या आहे 86 आणि थकीत रक्कम आहे 22 कोटी 10 लाख ते 1 कोटी दरम्यान रक्कम थकित असलेल्यांची संख्या आहे 254 आणि थकीत रक्कम आहे 58 कोटी 81 लाख पाच लाख ते दहा लाख रक्कम थकित असलेल्यांची संख्या आहे 1027 यांनी थकीत रक्कम आहे 60 कोटी रुपये तीन लाख ते पाच लाख रक्कम थकित असणाऱ्यांची संख्या आहे 1336 आणि थकीत रक्कम आहे 52 कोटी 15 लाख थकबाकीदारांमध्ये असलेली मोठी नाव भाजपाचे माजी खासदार निलेश नारायण राणे थकबाकीची रक्कम सुमारे 17 लाख रुपये भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या मालकीच्या कंपन्यांचे थकबाकी आहे सुमारे 66 लाख रुपये पुणे पोलीस आयुक्तालय आणि इतर इमारती यांची थकबाकी आहे सुमारे लाख रुपये पोलीस महासंचालक सी आय डी चे लाखो रुपये थकीत फर्ग्युसन कॉलेज सारख्या नामांकित शिक्षण संस्थेची ही लाखो रुपये पाणीपट्टी थकीत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे लाखो रुपये थकीत त्यामुळे आता वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून जर 25 जूनपर्यंत थकबाकी भरली नाही तर पाण्याच्या जोडण्या कापण्यात येणार असल्याचं या नोटीसमध्ये सांगण्यात आल आहे. मात्र, वसुलीसाठी महापालिका प्रशासनावर अनेकदा बड्या धेंडाकडून दबाव येत असल्यामुळे थकित रक्कमेची वसुली करणे महापालिकेला शक्य होऊन बसते.

14 जून 2020, 10 वाजून 10 मिनिट... 1 वर्षानंतर समोर आलं सुशांतच्या मृत्यूचं कारण

ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून यादी जाहीर करण्यात आली खरी मात्र प्रत्यक्षात वसुली होणार का हा खरा प्रश्न आहे. यांचं कारण वर्षानुवर्ष थकबाकीदार आपले राजकीय लागेबांधे वापरून प्रशासनावर दबाव आणतात. त्यामुळे थकबाकीची रक्कम कोटीच्या कोटी उड्डाणे घेते आहे.
Published by:sachin Salve
First published: