मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

...तर पुण्यातही नाईट लाईफ सुरू करणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

...तर पुण्यातही नाईट लाईफ सुरू करणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले रहाणार आहेत.

मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले रहाणार आहेत.

मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले रहाणार आहेत.

  • Published by:  Ajay Kautikwar
गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड 18 जानेवारी : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज सर्जा रेस्टॉरंटचं उदघाटन करण्यात आलं. प. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मालकीचं हे रेस्टॉरंट आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले. 24 तास हॉटेल चा विचार सध्या तरी केवळ मुंबई पुरता आहे. पण पुण्यासारख्या शहरांनी तसा प्रस्ताव ठेवला तर त्याबाबत विचार केला जाईल. असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिलेत. मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे. 24 तास आणि 7 ही दिवस सुरू रहाणार असलेली नाईट लाईफ रहिवासी भागातच प्रायोगिक तत्वावर सुरू रहाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणताच त्रास होणार नसल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. कारण, मुंबईच्या आधीच अहमदाबाद शहरात नाईट लाईफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे रहावं असं वाटतंय का असा सवालही त्यांनी विचारला आहे. या निर्णयामुळे हॉटेल, मॉल्स, थिएटरमधील उद्योग आणि रोजगार वाढणार असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा अभिनेत्री शबाना आझमींच्या अपघातानंतर PM मोदींनी केलं ट्वीट उद्यापासून शिर्डी बेमुदत बंद, मुख्यमंत्री तोडगा काढत नाहीत तोपर्यंत माघार नाही
First published:

Tags: Aaditya thackeray, Pune

पुढील बातम्या