'नकोशी' झाली 'हवीशी', दत्तक घेण्यासाठी अनेक दाम्पत्य सरसावले

'नकोशी' झाली 'हवीशी', दत्तक घेण्यासाठी अनेक दाम्पत्य सरसावले

चिमुकलीची प्रकृती उत्तम असून विश्रातवाडी पोलिसांनी तिला अरुणाश्रमाकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे,(प्रतिनिधी)

पुणे,19 डिसेंबर: आता बातमी आहे नकोशी बनलेल्या हवीशीची. पुण्यातील विश्रांतवाडीत बुधवारी एका नवजात बाळाला अशरशः कचरा कुंडीत फेकून देण्यात आलं होतं. पण केवळ कचरावेचक महिलेच्या प्रसंगावधनामुळे या चिमुकलीचा जीव थोडक्यात वाचला. या बेवारस नकोशीला दत्तक घेण्यासाठी आता अनेक दाम्पत्य सरसावले आहेत. पुण्यातील स्नेहगंध सोसायटीत बुधवारी लक्ष्मी डेबरे या कचरावेचक महिलेला हे नवजात बाळ कचरा कुंडीत सापडलं होतं. या बाळाच्या आईला ही चिमुकली कदाचित नकोशी झाली असावी, म्हणूनच तिचा जन्म होताच तिला एका उशीच्या खोळीत रक्ताळलेल्या नाळासह गुंडाळून फेकून देण्यात आलं होतं. पण या चिमुकलीचं नशीब बलवत्तर म्हणून लक्ष्मी डेबरे यांच्या दृष्टीस ती पडली आणि या चिमुलकीचा जीव थोडक्यात वाचला.

लक्ष्मी डेबरे यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. चिमुकलीची प्रकृती उत्तम असून विश्रातवाडी पोलिसांनी तिला अरुणाश्रमाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. जेणेकरून तिचं संगोपण होऊ शकेल.

दत्तक घेण्यासाठी अनेक दाम्पत्य सरसावले...

आनंदाची बाब म्हणजे चिमुकलीला दत्तक घेण्यासाठी अनेक दाम्पत्य सरसावले आहेत. त्यात डॉक्टर दाम्पत्याचा समावेश आहे. अशी माहिती विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे एपीआय संदीप यादव यांनी दिली आहे. या घटनेतील दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या स्नेहगंध सोसायटीत ही नवजात नकोशी आढळून आली त्या सोसायटीचे लोक या संवदेनशील बोलायला देखील तयार नाहीत. याउलट ज्या कचरावेचक लक्ष्मीने तिचा जीव वाचवला. त्या स्वच्छता संस्थेच्या सर्व महिलांनी मोठ्या आस्थेने या चिमुकलीची काळजी घेतली. तिला व्यवस्थितपणे पोलिसांमार्फत रुग्णालयात देखील पोहोवलं. म्हणतात ना, मायेच्या ममतेला कुठल्याही रक्ताच्या नात्याची गरज लागत नाही. हेच खरं..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2019 07:46 PM IST

ताज्या बातम्या