Home /News /pune /

'द' दारूचा नव्हे दुधाचा.. म्हणत पुण्यात पोलिसांनी असं केलं नववर्षाचं स्वागत

'द' दारूचा नव्हे दुधाचा.. म्हणत पुण्यात पोलिसांनी असं केलं नववर्षाचं स्वागत

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील देहूरोड पोलिसांनी हीच बाब लक्षता घेवून 31 डिसेंबरला 'दारू सोडा आणि दूध प्या', असा मोलाचा सल्ला दिला.

    अनिस शेख,(प्रतिनिधी) देहू,1 जानेवारी: सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याचा पायंडा अलिकडच्या काळात रुढ झाला आहे. यामुळे विशेषत: तरुणाईमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आबे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील देहूरोड पोलिसांनी हीच बाब लक्षता घेवून 31 डिसेंबरला 'दारू सोडा आणि दूध प्या', असा मोलाचा सल्ला दिला. देहूरोड शहरातील सवाना चौकात व्यसनमुक्त समाज निर्मितीबाबत नवीन वर्ष मद्यपान करून साजरा करणाऱ्या तरुणाईला व्यसनाच्या आहारी न जाता सुदृढ आरोग्य लाभावे. यासाठी जनजागृती करत मसाला दुधाचे वाटप केले. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या पुढाकाराने ही संकल्पना अमलात आली. मद्यपान करून वाहन चालवताना घडणाऱ्या संभाव्य धोक्याची माहिती तसेच दारूमुळे होणारे तोटे याची माहिती पोलिसांकडून या वेळी देण्यात आली. ऐरव्ही कारवाईच्या माध्यमातून मनात धडकी भरवणारे पोलीस नागरीकांना रस्त्यावर दूध पाजताना दिसत असल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पोलिसांकडून अनोख्या पद्धतीने साजरा होणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत तरुण पिढीनेही मोठ्या उत्साहात तसेच आनंदात केले. तरुणांची रक्तदान करत नव्या वर्षाची सकारात्मक सुरूवात नवीन वर्षाची सुरवात रक्तदानाने करण्याचा संकल्प गुहागरमधील तळवली गावातल्या युवकांनी केला आहे. तो आज प्रत्यक्षातही आणला आहे. यामुळे नवीन वर्षाची सकारात्मक सुरवात करत तळवली गावातील युवकांनी नवा पायंडा पडला आहे. त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जानेवारी 2019 रोजी तळवली गावातला शाहू बागकर हा तरुण एका अपघातात गंभीर दुखापत होऊन गतप्राण झाला होता. अपघातात डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्यामुळे शाहूला प्राण गमवावे लागले होते. त्याच्याच स्मरणार्थ रक्तदान करून कोणाचे तरी प्राण वाचतील हा घास मनात बाळगून तळवली येथील युवकांनी दरवर्षी रक्तदान करून नव्या वर्षाचे स्वागत कारण्याचा निर्णय घेतला. या तरुणांच्या उपक्रमाला साथ लाभली ती रत्नागिरीतल्या रक्तसंकलन विभागाने. त्यांनीही या उपक्रमाला पाठिंबा देत या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण नवनवीन फंडे वापरताना आपण पाहत असतो. मात्र, गुहागरमधील तळवली गावातल्या या तरूणांनी सुरू केलेली या समाजउपयोगी उपक्रमाची चर्चा साध्य सर्वत्र सुरू आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: New year, Pune news, Pune police

    पुढील बातम्या