ही संकट कमी होतं म्हणून की काय केरळजवळ अरबी समुद्रात एक नवीन संकट उद्भवण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत याठिकाणी हवेच्या कमी दाबाचा पट्टी सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस केरळ, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा पूर्वेकडे फिरण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हेही वाचा-मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि मिळवा मोफत जेवण किंवा सिनेमा त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना या दहा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस दक्षिण कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे.पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह🌩🌧 जोरदार पावसाची शक्यता. विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो.शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर संध्याकाळी व रात्री पर्यंत असते. IMD ने दिलेले इशारे पहा pic.twitter.com/IwZkHyzTGR
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Weather forecast