Home /News /pune /

लग्न झालेल्या प्रेयसीला भेटायला बोलवून चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, पुण्यातील थरारक प्रकार

लग्न झालेल्या प्रेयसीला भेटायला बोलवून चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, पुण्यातील थरारक प्रकार

आता माझं लग्न झालं आहे. तू माझ्या मागे लागू नको, असं म्हणताच...

पुणे, 24 नोव्हेंबर: पुण्यात पर्वती दर्शन (Pune Parvati Darshan) परिसरात लग्न झालेल्या मैत्रिणीला भेटायला बोलवून तिच्यावर अॅसिडसारखे (Acid Attack) द्रव्य फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्लात नवविवाहित तरुणी (रा. कसबा पेठ, पुणे )गंभीर जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अबुझर आय्याज तांबोळी (रा. पर्वती दर्शन, पुणे) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. हेही वाचा...पैसे भरण्यासाठी ATM मध्ये पोहोचलेल्या बाप-लेकाची मोठी फसवणूक मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी विवाहानंतर तिच्यापतीसोबत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माहेरी आली होती. आरोपी अबुझर याने तरुणीला भेटण्याच्या बहाण्यानं पर्वती दर्शन येथे बोलावलं होतं. अबुझरला भेटण्यासाठी तरुणी पर्वती दर्शनमध्ये पोहोचली. आता माझं लग्न झालं आहे. तू माझ्या मागे लागू नको, असं पीडित तरुणीनं आरोपी अबुझरला सांगितलं. मात्र, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 'तुझे आपने आपपर गुरूर है ना, देख मै अभी तेरा गुरूर तोड देता हू, असं म्हणत आरोपी अबुझर यांनी अॅसिड सारखे द्रव्य पीडित तरुणीच्या चेहऱ्यावर फेकलं. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दुसरीकडे दत्तवाडी पोलिसांनी आरोपी अबुझर आय्याज तांबोळी याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितलं की, प्रेम प्रकरणातून हा हल्ला करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी एअर कंडिशन दुरुस्तीचं काम करतो. या प्रकरणी वैद्यकीय अहवाल मागवण्यात आला आहे. BMW वर लघुशंका करण्यापासून रोखलं म्हणून गार्डला पेट्रोल टाकून पेटवलं दुसऱ्या एका घटनेत पुण्यातील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने एका रिक्षाचालकाला आपल्या मालकाच्या महागड्या गाडीवर लघुशंका करण्यापासून रोखलं तर रागाच्या भरात कथित स्वरुपात पेट्रोल टाकून आग लावली. ही घटना भोसरी औद्योगिक क्षेत्रात गेल्या आठवड्यात घडली. यामध्ये 41 वर्षीय सुरक्षारक्षक शंकर आगीत होरपळले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 31 वर्षीय रिक्षाचालक महेंद्र बाळू कदम याला अटक करण्यात आली आहे. आणि त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिताअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC) पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मंगळवारी दुपारी शंकर हे कंपनीच्या मुख्य दरवाज्यावर ड्यूटीवर तैनात होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या कदम यांनी तेथील एसयूव्ही कारवर लघुशंका करण्यास सुरुवात केली. ही कार कंपनीच्या मालकाची होती. त्यांनी सांगितलं की, गार्डने जेव्हा कदम यांना रोखलं तेव्हा त्याला राग आला. त्यावेळी तो तेथून निघून गेला. हेही वाचा...धारावीत चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; खाऊ देत असल्याचे सांगून तरुणाने... मात्र, त्यानंतर सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी एका बाटलीत पेट्रोल घेऊन रिक्षाचालक कंपनीसमोर येऊन उभा राहिला. आणि त्याने बाटलीतील पेट्रोल शंकर यांच्या अंगावर टाकली आणि आग लावली. यामध्ये सुरक्षारक्षक होरपळला. त्यानंतर तातडीने शंकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या प्रकरणात 31 वर्षीय रिक्षाचालक महेंद्र बाळू कदम याला अटक करण्यात आली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Crime news, Maharashtra, Pune, Pune news

पुढील बातम्या