गणेश दुडम, प्रतिनिधी
मुंबई, 18 मार्च : तुम्ही जर साताऱ्याहून मुंबईकडे येत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण शनिवारी आणि रविवारी कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्यातून मुंबईकडे येणारी वाहतूक काही दिवस बंद असणार आहे. 18 मार्च रोजी रात्री 11 वाजेपासून ते 19 मार्च पर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. त्यानंतर 23 मार्चलाही बंद असणार आहे.
कात्रज नवीन बोगद्यात व्हीएमएस आणि व्हिएसडी सिस्टिम बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे आज 18 मार्च रोजी पहिल्या टप्प्यात काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रात्री सुरू असल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
(मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोखंडी डिव्हायडर कारच्या थेट आरपार; काळजाचा थरकाप उडवणारे फोटो)
आज रात्री 11 वाजेपासून ते 19 मार्च पहाटे 2 वाजेपर्यंत हा मार्ग बंद असणार आहे. त्यानंतर दुसऱ्यात काम पार पडणार आहे. त्यासाठी 23 मार्च रोजी रात्री 11 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 24 मार्च रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत हा मार्ग बंद असणार आहे. या दोन टप्प्यात काम पूर्ण झाल्यावर कात्रज बोगद्यातील मुंबईकडे येणारी वाहतूक ही पूर्ववत करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग कोणता?
दोन टप्प्यात काम हाती घेण्यात आल्यामुळे साताऱ्याहून मुंबईत येण्यासाठी प्रवासी जुना कात्रज बोगदा मार्ग, नवले पूल, कात्रज चौक आणि विश्वास हॉटेलपासून सर्व्हिस मार्गावरून येण्याचा पर्याय असणार आहे.
(गोंदियातील विमान MP मध्ये कोसळलं! पायलटसह एकाच जागीच मृत्यू; घटनास्थळावरुन पहिले PHOTO)
दरम्यान, नवीन कात्रज बोगद्यात दोन टप्प्यात बंद ठेवण्यात आल्यामुळे एकाबाजूची वाहतूक बंद असणार आहे. ही वाहतूक फक्त साताऱ्याकडून मुंबईकडे येणारी बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ही सुरू असणार आहे, नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18