Home /News /pune /

पुण्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच! आणखी समोर आले कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

पुण्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच! आणखी समोर आले कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात पुणे शहरसह जिल्ह्यात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे.

पुणे, 16 जुलै: राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात पुणे शहरसह जिल्ह्यात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शहरालगतचा हवेली तालुकाही आता कोरोनाचा नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. त्यात विशेषत: खडकवासला आणि खानापूर परिसरात तर 250 हून जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गावांनी लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच ही स्वयंपूर्तीने ही गावं बंद ठेवली आहेत. हेही वाचा...धक्कादायक! महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांचा कोरोना, पुण्याला हलवलं खडकवासला, किरकिटवाडी, खानापूर, डोनजे, गोऱ्हे ही गावं कोरोनाबाधित असून रुगसंख्या 250 च्यावर पोहोचली आहे.  दुसरीकडे नगर रोडला वाघोली, सोलापूररोडला मांजरी या पुण्यालगतच्या गावात सर्वाधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागात 4000 रुग्ण आहेत. त्यापैकी 2500 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यालगतची 23 गावांमध्येही कोरोनाचा उद्रेक... पुणे शहरालगतच्या 23 गावांमध्येही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी तिथं आता प्रत्येक 50 कुटुंबांमागं एक सेक्टरप्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेक्टर प्रमुखाच्या माध्यमातूनच तिथल्या कोरोना साथीचं निर्मुलन केलं जाणार आहे. -शहरालगतच्या हवेली तालुक्यात अँक्टिव्ह रूग्णांची संख्या 850 च्यावर -पुणे ग्रामीण भागातील रूग्णसंख्या 4 हजारांवर, तर 100 दगावले पुणे शहरात तर कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. पण मनपा हद्दीलगतची 23 गावं देखील कोरोनाबाधीत बनली आहेत. कारण या गावांमधील बहुतांश लोक हे नोकरी धंद्यानिमित्त पुणे शहरात येजा करतात. म्हणूनच 23 गावांमधील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी या गावांमध्ये लॉकडाऊन काळात सगळीकडे फवारणी केली जात आहे. तसंच घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण केलं जात आहे. तसंच या शहरालगतच्या गावांमधून झेडपी सीईओ आयुष प्रसाद यांनी प्रत्येक 50 कुटुंबांमागे एक सेक्टर प्रमुख नियुक्त करण्याचे निर्देश दिलेत, अशी माहिती पुणे झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली आहे. दरम्यान, नऱ्हेसारख्या गावांमध्ये एकाचवेळी प्रांत आणि पुणे पोलिस अशा दोन्ही यंत्रणांकडून भिन्न स्वरूपाचे आदेश पारित केले गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तसंच सततच्या सीलबंद लॉकडाऊनला नोकरदारही वैतागले आहेत. हेही वाचा...विमा कंपनीचं भिजत घोंगडं, बीडमध्ये मुंडे बहीण-भावात श्रेयवादाचं राजकारण सुरू पुणे शहरालगतच्या या 23 गावांमध्ये यापूर्वीच सीलबंदचे आदेश जारी झाले आहे. तरीही कोरोनाचा फैलाव काही केल्या थांबत नाही आहे. झेडपी सीईओंची ही सेक्टर प्रमुखाची संकल्पना तरी वर्कआऊट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Pune news

पुढील बातम्या