Home /News /pune /

BREAKING: महाराष्ट्रापुढे नवं संकट, झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला!

BREAKING: महाराष्ट्रापुढे नवं संकट, झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला!

पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे.

  पुणे, 31 जुलै : गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथीने जगभर थैमान घातलं आहे. कोरोनाची लाट जरी ओसरली असली तरी राज्यापुढे नवीन संकट येऊन ठेपलं आहे. झिका व्हायरसचा (Zika Virus) पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ANI वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. या महिलेची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वेळेपेक्षा अर्धा तास जास्त काम करावं लागलं तरी कंपनीला द्यावा लागणार ओव्हरटाइम दरम्यान,  पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे.  झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या  महिलेस विषाणु आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी टीमचा डंका, क्वार्टर फायनलमध्ये धडक झिका हा आजार डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराप्रमाणे एडीस इजिप्ती या डासांमुळे पसरतो.  याकरता बाधित क्षेत्रांमध्ये डास अळी घनता सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आले असून कीटकशास्त्र सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात लोकसहभाग घेण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहेत. बाधित भागातील डासोत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याची डबकी बुजवणे, वाहती करणे,  योग्य ठिकाणी गप्पी मासे सोडणे तसेच घरगुतीसाठवलेल्या पाण्यामध्ये अळीनाशकाचा वापर  करणे, बाधित भागात धुरळणी करणे इत्यादी कृती योजना सुरु करण्यात आल्या आहेत. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. झिका व्हायरस सर्वप्रथम कुठे आढळला? झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. 1950पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला,. 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महामारी घोषित केलं होतं. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं. ताप, सांधेदुखी, शरीरावर चट्टे अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.

  तुरुंगातील छप्पर आणि भिंत कोसळल्याचं धक्कादायक CCTV फुटेज; 21 कैदी गंभीर जखमी

  झिका विषाणूवर अद्याप औषध नाही; मात्र इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन (Inactivated Vaccine) विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिले आहेत. मार्च 2016पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत. यासाठी 10 वर्षं लागू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा संसर्ग अधिक धोकादायक आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या