खळबळजनक! आळंदीत इंद्रायणी नदीच्या काठावर नवजात अर्भक सोडून आई-वडिल फरार

खळबळजनक! आळंदीत इंद्रायणी नदीच्या काठावर नवजात अर्भक सोडून आई-वडिल फरार

ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शेकडो भाविक आळंदित दाखल झाल्याने नेमकं हे कृत्य कुणी केलं असेल याचा आळंदी पोलीस शोध घेत आहेत.

  • Share this:

आळंदी, 17 नोव्हेंबर : आळंदीतील इंद्रायणी नदीच्या घाटावर नवजात अर्भक  सोडून जन्मदाते पसार झाल्याची मनसुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. सोडलेलं अर्भक स्त्री जातीचं असल्याने माऊलीच्या दारात या चिमुकलीवर नकोशी होण्याची वेळ आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. खरंतर समाजात मोठ्या प्रमाणावर 'बेटी बचाव' असा नारा देत समाजप्रबोधन केलं जातं. पण त्याचा परिणाम किती लोकांना होतो हा मोठा प्रश्न आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शेकडो भाविक आळंदित दाखल झाल्याने नेमकं हे कृत्य कुणी केलं असेल याचा आळंदी पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, चिमुकलीची प्रकृती स्थिर असून तिला  जवळच्या शिशुविहारात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये अशा धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

वर्ध्यातही असा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दीड दिवसांच्या नवजात शिशुला नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हिंगणा तालुक्यातील मांगली शिवारातील रस्त्यालगतच्या नाल्यात नवजात शिशु मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ही घटना, 22 ऑक्टोबर सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आली. अनैतिक संबंध लपवण्यासाठी या शिशुची हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मांगली समोरून मांडवघोराडकडे वळणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाल्याच्या पुलाखाली एक नवजात शिशु पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळले. त्यानंतर त्यांनी तत्काळ याची सूचना हिंगणा पोलिसांना दिली. त्यानंतर, पोलिस उपनिरीक्षक अनील धानोरकर, हवालदार बतखल आणि अरुण इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने नवजात शिशुला बाहेर काढले. त्या बाळाला अंगड-टोपर व डायपर लावले होते. त्याचा जन्म एक ते दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिस त्या बाळाच्या मातेचा शोध घेत आहेत.

भैरवनाथाच्या सोनुबाई तीर्थकुंडात नवजात अर्भक फेकून माता पसार..

दरम्यान, गेल्या महिनाभरापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील भैरवनाथाच्या सोनुबाई तीर्थकुंडात नवजात अर्भक फेकून माता पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. परंडा तालुक्यातील सोनारी गावातील भैरवनाथ मंदिरासमोरील सोनुबाई तीर्थमध्ये एका निर्दयी मातेने आपले नवजात अर्भक फेकले होते. स्त्री जातीचे हे अर्भक असून ते पाण्यावर तरंगताना दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी महिलेचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला होता.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 17, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading