Home /News /pune /

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर ‘रुबी’मध्ये उपचार

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर ‘रुबी’मध्ये उपचार

15 दिवसांपूर्वी त्या जालना दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यानंतर पुण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती बरी नव्हती. प्लेट् लेट्स कमी झाल्याचं निदान झालं होतं.

पुणे 19 जुलै: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (NCP Women state president- Rupali Chakankar) यांना रूबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic Pune) हलविण्यात आलं आहे. त्यांना डेंग्यूची लक्षणं दिसत होती त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती स्वत: चाकणकर यांनीच दिली आहे. सध्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मी आपल्या सर्वांचे प्रेम व काळजी समजू शकते लवकरच आजारातून बाहेर पडेल असंही त्यांनी म्हटलं आहे. फेसबुक पोस्टवरून त्यांनी ही माहिती दिली. 15 दिवसांपूर्वी त्या जालना दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यानंतर पुण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती बरी नव्हती. प्लेट् लेट्स कमी झाल्याचं निदान झालं होतं. ही डेंग्यूची लक्षणे असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनामुळे जास्त चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र कोरोना नसल्याची माहिती देण्यात आली आहे. अशी आहे राज्यातली कोरोनाची स्थिती राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झालीय. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 9518 रुग्ण आढळून आले आहेत. तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3,10,455 एवढी झालीय. तर मृत्यूचा आकडा 12 हजारांच्या जवळ गेला आहे. आज 3906 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 1,28,730 Active रुग्ण आहेत. तर राज्यातल्या एकूण मृत्यूची संख्या ही 11 हजार 854 वर गेली आहे. भारत शोधणार COVID-19वर लस, 7 भारतीय कंपन्यांवर सर्व जगाची  लागली नजर! आज मुंबईत 1038 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतल्याच एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 388 एवढी झाली आहे. आज मुंबईत 64 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची मृत्यूसंख्या ही 5714 वर गेली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: NCP

पुढील बातम्या