रणजितसिंह मोहिते पाटलांना सुप्रिया सुळेंचं 'ओपन चॅलेंज'

रणजितसिंह मोहिते पाटलांना सुप्रिया सुळेंचं 'ओपन चॅलेंज'

'लोकसभा निवडणुकांसाठी विरोधक कोणी ना कोणी असणारच आहे. पण त्यासाठी मी माझा अभ्यास पूर्ण करून आता परीक्षा देणार' असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 23 मार्च : 'रणजितसिंह मोहिते यांना माझं खुल आव्हान आहे. त्यांना आजवर राष्ट्रवादीने काय दिलं नाही याची समोरासमोर चर्चा करा', असं थेट आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढ्यात मोठा धक्का बसला.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल

'लोकसभा निवडणुकांसाठी विरोधक कोणी ना कोणी असणारच आहे. पण त्यासाठी मी माझा अभ्यास पूर्ण करून आता परीक्षा देणार' असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सध्या राजकीय  घडामोडींना वेग आला आहे. बारामतीतून सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणुका लढणार आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल या दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. त्यामुळे विरोधात कोणीही असलं तरी माझा अभ्यास झाला आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. दरम्यान कांचन कुल यांचं माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नात्याने कांचन कुल यांच्या चुलत आत्या आहेत. त्यामुळे बारामतीची लोकसभा अटीतटीची असणार इतकं खरं.

दरम्यान, 'माझ्या कामाचं मुल्यमापन करून जनता मला मतदान करेन' असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. न्यूज18 लोकमतशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवरही सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही त्यांनी खुलं आव्हान केलं आहे.

पार्थ पवारांबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

'कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. पुस्तकाच्या कव्हरवरून पुस्तक कसं असेल ते ठरवू नका.' असं सुप्रिया सुळे पार्थ पवारांची बाजू मांडताना म्हणाल्या. पार्थ पवारांच्या मावळमधील सभेत त्यांनी पहिल्यांदाच तीन मिनिटांचं भाषण केलं होतं. मात्र आजोबा आणि बाबांसमोर बोलताना ते अडखळले. त्यामुळे पार्थ पवारांच्या त्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली.

दरम्यान, लोकसभेसाठी उभं राहणाऱ्या उमेदवाराला साधं भाषण करता येऊ नये का असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर पार्थ यांनी स्पष्टिकरणही दिलं होतं. माझी भाषणाची ही पहिलीच वेळ असल्यामुळे भाषण जमलं नाही. मात्र आता भाषण नाही तर काम करून दाखवणार असं पार्थ यांनी स्पष्ट केलं होतं.


VIDEO: उदयनराजे म्हणाले...'मी जे बोललोच नाही, ते दाखवले गेले'


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2019 06:27 PM IST

ताज्या बातम्या