राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? जयंत पाटलांनी केला खुलासा

राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? जयंत पाटलांनी केला खुलासा

...मग शिवसेनेसोबत कसे जात आहेत? असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, दगडापेक्षा वीट मऊ.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, पुणे 17 नोव्हेंबर : राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस चिघळताना दिसतो. शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अजुन काहीच ठरताना दिसत नाहीये. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरात बोलताना नवं सरकार एवढ्यातच स्थापन होणार नाही असं स्पष्ट केलं. काँग्रेस राष्ट्रवादीचं चर्चेचं गुऱ्हाळ अजुनही सुरूच आहे. त्यातच वेगवेगळ्या चर्चांना उत आलाय. एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचे दावेही केले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत शंकाही निर्माण केल्या जात आहेत. त्यावरच आज पत्रकारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आणि जयंत पाटील यांनीही त्याचा खुलासा केलाय.

सत्ता स्थापनेसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार असल्याचंही बोललं जावू लागलं. त्यावर थेट प्रश्न जयंत पाटलांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले. राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाणार नाही. ही विचारधारेची लढाई आहे. आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. त्यामुळे आम्ही एकत्र येणार नाही. मात्र मग शिवसेनेसोबत कसे जात आहेत? असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, दगडापेक्षा वीट मऊ. भाजप मध्ये गेलेले आणि काही अपक्ष संपर्कात आहेत,आम्ही मेगाभारती करणार नाही तर मेरिट भरती करु असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेची चिंता वाढली; अजित पवार म्हणतात, सत्तावाटपाचं काहीच ठरलेलं नाही

उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट टळली

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन त्यांना अभिवादन केलं. मात्र यावेळी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक इथं असणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस हे स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहून निघून गेले.

भाजप आणि शिवसेना युतीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर येणार का, याबाबत चर्चा होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही भाजप नेत्यांनी शिवाजी पार्कवर जात बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मात्र यावेळी तिथं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'आवाज कुणाचा...शिवसेनेचा', अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दुमदुमून सोडला.

राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? 20 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते...

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहन्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळास भाजपचे नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या करत त्यांना अभिवादन केलं आहे.

First published: November 17, 2019, 8:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading