फडणवीस-ठाकरे वादात राष्ट्रवादीची उडी, अमृता फडणवीसांवर विखारी टीका

फडणवीस-ठाकरे वादात राष्ट्रवादीची उडी, अमृता फडणवीसांवर विखारी टीका

अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, पुणे, 28 डिसेंबर : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर शिवसेनेनंही पलटवार केला. मात्र आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे.

'काहीही वक्तव्य करून प्रकाशझोतात येण्याचा निष्फळ प्रयत्न सध्या अमृता फडणवीस या करत आहेत. पण त्यांनी आता शब्दांना आवर घालून अशी वक्तव्य करणं टाळायला हवं. मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीही योगदान दिलेलं नाही. मात्र आता वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्या आरोप करत आहेत. त्यांनी आता माजी मुख्यमंत्र्यांना धीर द्यायला हवा,' अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

'मर्द होतास तर तपास का नाही केला?' केसरकरांच्या आरोपानंतर नारायण राणे भडकले

दरम्यान, अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर कमालीच्या सक्रीय झाल्या आहेत. भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांची ट्विटरवरची सक्रियता जास्तच वाढली असून त्यांनी आता थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल केला.

शिवसेनेनंही अमृता फडणवीस यांना फटकारलं होतं.'गेल्या ५ वर्षात आपण महाराष्ट्राला आपल्यावर टीका करण्यासाठी अनेकदा संधी दिली. पण शिवसेनेने कधीही वैयक्तिक टीका केली नाही. कारण आपण राजकारणात नव्हतात. आता जर तुम्हाला कंठ फुटला असेल तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा. देवेंद्र फडणवीस यांचे पण हेच मत असल्याचे समजते,' असा खोचक टोला युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना लगावला होता.

Published by: Akshay Shitole
First published: December 28, 2019, 12:59 PM IST

ताज्या बातम्या