• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • 'महिला सुरक्षेच्या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या' रुपाली चाकणकरांची राज्यपालांना विनंती

'महिला सुरक्षेच्या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या' रुपाली चाकणकरांची राज्यपालांना विनंती

Rupali Chakankar on woman molested in bjp corporator office: राज्यपालांनी भाजप पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्यावी अशी विनंती रुपाली चाकणकर यांनी राज्यपालांना केली.

  • Share this:
पुणे, 23 सप्टेंबर : मुंबईतील (Mumbai) एका महिलेवर भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात (BJP Corporator office) बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरुन आता राजकारणही चांगलेच रंगताना दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) या मुद्द्यावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे तर भाजपनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटलं, महिला सुरक्षिततेबाबत विशेष अधिवेशन घेण्याऐवजी भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा घ्यावी ही राज्यपाल यांना विनंती आहे, त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील महिला सुरक्षित रहातील. या प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं, ज्या पीडित महिला आहेत त्यांच्याशी संबंधित व्हिडीओ आम्ही पोलीस स्टेशनला देणार आहोत. नगरसेविका अंजली यांनीही यांनीही पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे. ही महिला आम्हाला पोलीस आणि वकिलांच्या नावाने धमकवण्याचं काम करते असं अंजली खेडेकरांनी लिहिलं आहे. नेमकं काय आहे प्रकरण? मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयातच एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नगरसेविकेच्याच कार्यालयात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली परिसरातील एका भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेवर भाजप कार्यकर्त्याने बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर तक्रार दाखल करुनही पोलिसांनी महिनाभर दखल घेतली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अखेर आता बोरिवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला एक समाजसेविका आहे. ही महिला भाजपच्या कार्यालयात काही कामासाठी गेली होती त्यावेळी आरोपीसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पीडित महिला भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात गेली असता आरोपीने कार्यालय बंद करुन पीडित महिलेचा विनयभंग करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. भाजपची ताईगिरी गेली कुठे? महापौर कडाडल्या या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी पुढे येता आता गप्प का? भाजपच्या महिलांची आता ताईगिरी गेली कुठे? असा सवालही महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, इतर घडलेल्या घटनांवर भाजपच्या महिला राजकारण करतात. स्वत:च्या दिव्याखाली अंधार. जेव्हा तुमच्याच ऑफिसमध्ये अशा घटना घडतात तेव्हा तुमची ताईगिरी जाते कुठे? दरवेळेला राज्याला बदनाम केलं जातं. मी काही तरी वेगळं करते असे ताईगिरी दाखवता, पब्लिसीटी स्टंट करण्यासाठी पुढे येता आता गुपचिळी का? ताईगिरी करत होत्या त्यांचा फोन आता बंद.
Published by:Sunil Desale
First published: