शरद पवारांच्या गुगलीमुळे नगरच्या जागेवरून पुन्हा ट्वीस्ट

'सुजय राष्ट्रवादीतून लढणार याबद्दल मीच पेपरमधून वाचतोय. त्यामुळे माध्यमांमुळे माझ्या ज्ञानात भर पडत आहे' असं म्हणत पवारांनी सुजय विखे यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याच्या चर्चेला पूर्णविऱ्हाम दिला असं म्हणायला हरकत नाही.

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 07:02 PM IST

शरद पवारांच्या गुगलीमुळे नगरच्या जागेवरून पुन्हा ट्वीस्ट

पुणे, 05 मार्च : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये गुप्त बैठका सुरू असल्याच्या चर्चा रंगत असताना 'मी विखेंना भेटलोच नाही' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर 'सुजय विखे हा राष्ट्रवादीमधून निवडणुका लढत असल्याचं मला माध्यमांच्या बातम्यांमुळेच समजलं' असंही पवार म्हणाले.

'सुजय राष्ट्रवादीतून लढणार याबद्दल मीच पेपरमधून वाचतोय. त्यामुळे माध्यमांमुळे माझ्या ज्ञानात भर पडत आहे' असं म्हणत पवारांनी सुजय विखे यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याच्या चर्चेला पूर्णविऱ्हाम दिला असं म्हणायला हरकत नाही.

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती.  दोघांमध्ये सोमवारी रात्री बैठक झाली. यात विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय यांच्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. लवकरच सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहितीही समोर आली होती. पण मी विखेंना भेटलोच नसल्याचं पवार यांनी माध्यमांना सांगितलं.

हेही वाचा: ज्या नेत्याला मोदींना हरवायचं त्याच्या वडिलांनी वाचवलं होतं काश्मीर

पवारांच्या या स्पष्टीकरणामुळे नगरच्या जागेवरून आता संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी टाकलेल्या या गुगलीचा आता वेगवेगळा अर्थ काढण्यात येत आहे. दरम्यान, नगरच्या जागेवरून अद्याप कोणतीही चर्चा करण्यात आलेली नसल्याचंही पवार म्हणाले. तर यावर 7 मार्चला बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात आता नगरच्या जागेवरून मोठा संभ्रम तयार झाला आहे.

Loading...

दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अशातच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही तुफान चर्चा आहे. पण त्यावर पवारांच्या या वक्तव्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

सुजय विखे पाटील यांची उमेदवारी आणि नाट्यमय घडामोडी

आघाडीत अहमनगरच्या लोकसभा मतदारसंघावरून अनेकदा तिढा निर्माण झाला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत नुकताच खुलासा केला आहे. ही जागा राष्ट्रवादीचीच असून संभ्रमावस्था निर्माण करू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला दिली असल्याचं सांगितल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांनी असं कुठलंही विधान केलं नसल्याचं म्हटलं. आणि त्यानंतर आता अजित पवार यांनीही ही जागा राष्ट्रवादीचीच असल्याचं म्हटलं आहे.


हा VIDEO पाहिल्यावर तुमचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 07:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...