जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune NCP : पुण्यात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट, या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

Pune NCP : पुण्यात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट, या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

अजित पवार

अजित पवार

या बंडामुळे शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. दोन गट तयार झाले, अजित पवार विरुद्ध शरद पवार आणि आमदारांसोबत कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातही गटबाजी सुरू झाली.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, प्रतिनिधी वैभव सोनवणे: अजित पवार यांनी 8 मंत्र्यांसोबत बंड केलं आणि थेट राजभवनात जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला. या बंडामुळे शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. दोन गट तयार झाले, अजित पवार विरुद्ध शरद पवार आणि आमदारांसोबत कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातही गटबाजी सुरू झाली. अजित पवार गटाच्या गोटातून सध्या एक चर्चा जोर धरु लागली आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी दिपक मानकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिपक मानकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. Pawar Family : ‘पवार कुटुंबीय आतून एकच ते फुटणार नाहीत..’; पवारांच्या वर्गमित्राला अजूनही विश्वास, म्हणाले.. अजित पवार यांच्या हस्ते आज नियुक्ती पत्र मिळू शकतं. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लवकरच कार्यालयात पुण्यात सुरू होणार आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचं दिसत आहे. शहर अध्यक्ष म्हणून मानकर तर महिला शहर अध्यक्षपदाची जबाबदारी रूपाली ठोंबरे वर असण्याची शक्यता आहे. पवार विरुद्ध पवार दोन्ही गटाचं काल शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं. यावेळी अजित पवार यांना 35 हून अधिक आमदारांचा पाठिंबा होता. तर शरद पवार यांना 13 आमदारांचा पाठिंबा होता. सर्व विचार करुनच निर्णय घेतल्याचा दावा अजित पवार गटातील मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी केला आहे.

Raj Thackeray : ‘याची सुरूवात शरद पवारांनी केली, आता शेवट…’, राज ठाकरेंनी इतिहास काढला
News18लोकमत
News18लोकमत

दुसरीकडे अजित पवार हे पुण्यातील पालकमंत्रिपदासाठीही बोलू शकतात त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची गोची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दादा विरुद्ध दादा असा पेच भाजपसमोर निर्माण होऊ शकतो. येत्या काळात आणखी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit Pawar , NCP
  • First Published :
जाहिरात
जाहिरात