Home /News /pune /

VIDEO: शरद पवारांचा आज मेट्रोतून प्रवास, अधिकाऱ्यांकडून घेतली कामाची माहिती

VIDEO: शरद पवारांचा आज मेट्रोतून प्रवास, अधिकाऱ्यांकडून घेतली कामाची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP President) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मेट्रोची (Metro) सफर केली आहे.

पुणे, 17 जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP President) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मेट्रोची (Metro) सफर केली आहे. शरद पवारांनी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) ते फुगेवाडी मेट्रोनं प्रवास केला आहे. तसंच यावेळी शरद पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाची माहिती घेतली. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी असा मेट्रो प्रवास केला आहे. आज शरद पवार यांनी पिंपरीतील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रोनं प्रवास केला. आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास शरद पवार फुगेवाडीत आले होते. यावेळी त्यांनी दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली. शरद पवार यांनी फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवास केला. सध्या पिंपरीतील मेट्रोचं काम शेवटच्या टप्प्यात आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Sharad pawar

पुढील बातम्या