‘नाराजी’ नाही तर ‘हे’ होतं मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण, शरद पवारांनी केला खुलासा

‘नाराजी’ नाही तर ‘हे’ होतं मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण, शरद पवारांनी केला खुलासा

'मुख्यमंत्र्यांशी वारंवार भेटणं होत असतं त्याचे उगाच अर्थ काढू नका, आमच्यात चांगला समन्वय आहे.'

  • Share this:

पुणे 7 जुलै: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. त्या भेटीविषयी तर्कवितर्क लावले जात होते. या बहुचर्चित भेटीवर शरद पवार यांनी आज खुलासा केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिल्यानंतर त्या स्थळापासून मातोश्री जवळच होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आपण गेलो होतो असा खुलासा त्यांनी केला.

ही नेहमीसारखीच भेट होती. त्यात वेगळं असं काही नव्हतं. मुख्यमंत्र्यांशी वारंवार भेटणं होत असतं त्याचे उगाच अर्थ काढू नका असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष मुख्यंत्र्यांवर नाराज आहे असं म्हटलं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या या स्पष्टिकरणाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

ते म्हणाले, माझ्या एका मुलाखतीचं रेकॉर्डिंग होतं, त्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. मातोश्री जवळ असल्याने तिथे गेलो होतो. त्यात मला कमीपणा वाटत नाही. पोलीस उपयुक्तांच्या बदल्यांबाबत कुणाचे काही गैरसमज नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; 30 टक्के अभ्यासक्रम करणार कमी

कोरोनाचा व्यापारावर परिणाम झालाय. व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींची भेट घेतली. त्यांचे प्रश्न राज्य सरकारच्या कानी घालणार आहे. महाराष्ट्रचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे हे विविध प्रकारच्या व्यवसायांचे केंद्र आहे. कोरोनामुळे देशाला जबरदस्त किंमत मोजावी लागते आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत येत्या शनिवारपासून 3 भागांमध्ये प्रसारित होणार आहे. याच मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यावर भाष्य केलं आहे.

'पहाटे शपथविधी झाला तेव्हा अनेकांनी पवारांना आरोपाच्या पिंजऱ्यात ठेवले होते. पण तेव्हा हे शरद पवार योद्ध्यासारखे उभे राहिले. लॉकडाऊन, डेडलॉक तोडून त्यांनी सरकार स्थापन केले,' अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी पवारांची स्तुती केली आहे.

सरकारचा मोठा निर्णय! तरुणांना नोकरीची संधी, 10 हजार पोलिसांची होणार भरती

'ही खिचड़ी नाही, हे सरकार तीन पक्षांनी येत तयार केलं आहे. ते पाच वर्षे टिकेल. सत्ता स्थापन प्रक्रियेविषयी शरद पवारांची खुली मुलाखत घ्यायची होती, पण काही कारणानं ती मागे पडली. पवार साहेबांच्या खासगी मुलाखती शेकडो घेतल्यात, पण खुली मुलाखत आता घेत आहे. अन्य राजकीय नेत्यांच्याही मुलाखती घेणार आहे,' असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 7, 2020, 7:35 PM IST

ताज्या बातम्या