29व्या वर्षी पार्थ पवार आहेत 20 कोटींचे मालक!

29व्या वर्षी पार्थ पवार आहेत 20 कोटींचे मालक!

मावळचे उमेदवार पार्थ पवार यांना कोट्याधीश म्हटलं तर हरकत नाही. कारण त्यांच्याकडे तब्बल 20 कोटींची संपत्ती आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 09 एप्रिल : पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार यांच्याकडे 20 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पार्थ हे अजित पवारांचे चिरंजीव आहेत. तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. राष्ट्रवादीने त्यांना मावळमधून उमेदवारी दिली.

जेव्हापासून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तेव्हापासून पार्थ पवार प्रचाराला लागले आहेत. मावळमध्ये त्यांच्या नावाची एकच चर्चा आहे. यात सगळ्यांनाच उस्तुकता होती ती पार्थ यांच्या संपत्तीविषयीची. खरंतर मावळचे उमेदवार पार्थ पवार यांना कोट्याधीश म्हटलं तर हरकत नाही. कारण त्यांच्याकडे तब्बल 20 कोटींची संपत्ती आहे.

20 कोटींच्या संपत्तीमध्ये तीन कोटी 69 लाख 54 हजार 163 रुपयांची जंगम, तर 16 कोटी 42 लाख 85 हजार 170 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचीही आता जोरदार चर्चा सुरू आहे.

पार्थ पवारांसाठी धोक्याची घंटा, मावळमध्ये भाजप-शिवसेनेचं अखेर मनोमिलन

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. पण श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला युतीतील घटपक्ष असणाऱ्या भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध दर्शवला होता. पण आता अखेर मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद मिटला.

श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच मनोमिलन झालं. तसंच या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेचंही आयोजन केलं आहे. शिवसेना-भाजपचं हे मनोमिलन राष्ट्रवादीचे याठिकाणचे उमेदवार पार्थ पवार यांची डोकेदुखी वाढवणारं ठरेल, अशी शक्यता आहे.

मावळमध्ये होणार जोरदार लढत

लोकसभा निवडणुकीसाठीची मावळ या मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. आता जाहीर झालेल्या उमेदवारी यादीत शिवसेनेकडून बारणे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

गेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. यावेळी मात्र हा मतदारसंघ चर्चेत आला तो राष्ट्रवादीच्या नव्या खेळीने. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितल्याने पार्थ मावळमधून लढत आहेत.

या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसेच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

VIDEO : शरदराव, तुम्हाला शोभतं का? मोदींनी का विचारला पवारांना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading