Home /News /pune /

मोठी बातमी : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार

मोठी बातमी : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार

कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, अनेक कोटींची कर्जे तसेच नवीन सभासद न केल्याने कारखाना लढून जिंकून आलो तरी कारखाना चालविता येणार नसल्याचे सांगत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पॅनल उभे करणार नाही, अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

पुढे वाचा ...
पुणे, 23 सप्टेंबर : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) माघार घेतली आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, अनेक कोटींची कर्जे तसेच नवीन सभासद न केल्याने कारखाना लढून जिंकून आलो तरी कारखाना चालविता येणार नसल्याचे सांगत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पॅनल उभे करणार नाही, अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांचे या कारखान्यावर वर्चस्व आहे. हा साखर कारखाना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आल्यापासून कारखान्यात सहकार हे फक्त नावालाच राहिले असून हा कारखाना खासगी कारखान्यांप्रमाणे चालवला जात आहे. सभासद व ऊस उत्पादक यांच्यावर अन्याय करून ऊस दर इतर कारखान्यांच्या तुलनेत 400 ते 500 रुपये टनाला कमी दिला जात आहे. या कारखान्याच्या नावावर नवीन मशिनरी खरेदी करून त्या मशनरी स्वतःच्या खाजगी कारखान्यात बसविण्यात आल्या आहेत. ऊस वाहनांचा करार कर्मयोगी कारखान्यासाठी करायचा, मात्र प्रत्यक्षात ती वाहने ऊस वाहतूक करण्यासाठी स्वतःच्या खासगी कारखान्यात वापरून पेमेंट मात्र कर्मयोगी मधून केल्याने अशा प्रकारच्या अनेक कारणांमुळे या कारखान्यावर खूप मोठा कर्जाचा बोजा पडला आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून केला आहे. हे वाचा - Dombivli gang rape: 29 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर 9 महिने गँगरेप, 4 वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार ऊस उत्पादकांचे पैसे जानेवारीपासून आज अखेर नऊ महिने झाले तरी मिळालेले नाहीत कामगारांचे तब्बल दहा महिन्याचे पगार थकीत आहेत. त्यामुळे कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत. विरोधी गटातील ऊस उत्पादकांना जाणून बुजून सभासद केलेले नाही. त्यांच्या अनामत रक्कम भरून घेतले आहेत, परंतु त्यांना सभासद केलेले नाही. तसेच विरोधी गटातील सभासदांचे ऊस जाणून-बुजून पाच वर्षे घेतलेले नाहीत आणि ऊस पुरवठा केलेला नाही म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे. तसेच वारसाहक्काने विरोधी सभासदांच्या वारसांना सभासद करून घेतले नाही. हे वाचा - विकृतीचा कळस! नवऱ्यानेच रेकॉर्ड केला बायकोच्या आत्महत्येचा VIDEO, सोशल मीडियावर अपलोडही केला साखर कारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांसाठी चालविण्याची साधन आहे. तसेच कारखान्याची परिस्थिती ज्यांनी बिकट केली आहे, त्यांनी ज्या कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना ताब्यात आणणे गरजेचे आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या कारखान्याच्या निवडणुकीत पॅनेल उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Pune, Sugar facrtory, Sugarcane farmer

पुढील बातम्या