'पुणेकरांनी शोधलेल्या Corona Vaccine वर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये'

'पुणेकरांनी शोधलेल्या Corona Vaccine वर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये'

ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाही तर कोणीतरी म्हणायचे मीच शोधली.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 28 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी पुणे दौऱ्यावर आहेत. ते सीरम इन्स्टिट्यूटला (serum Institute, Pune) भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सडकून टीका केली आहे.

पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लसीवर (Corona Vaccine) बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये, अशा शब्दांत

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा...रोहित पवारांनी केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत, भाजप नेत्यांकडे केली 'ही' अपेक्षा

पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तुमच्या येथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण मारतं तुम्हाला चांगलं माहीत आहेच. ते आज आपल्या पुण्यात आले आहेत. बघा 'दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं'. जग फिरल्यावर शेवटी लस सापडली आमच्या पुण्यात. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाही तर कोणीतरी म्हणायचे मीच शोधली. पुण्यामध्येच ही लस निर्माण करण्यात आली आहे. पुणेकरांनी ती लस शोधली आहे. त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी दावा करू नये, अशा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, सरकार कोसळणार, असा पाढा विरोधकांना लावला आहे. मात्र, आता पुढची पाच वर्षेचं नव्हे तर 25 वर्षे कधी उलटतील, हे कळणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यात आगमन झालं आहे. ते मांजरीला होणार रवाना होणार असून तिथे असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. 'सिरम'मध्ये कोरोना लसीचा आढावा घेणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं आहे. एवढं नाही तर त्यांच्याकडून एक अपेक्षाही व्यक्त केली आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात (पुणे) हार्दिक स्वागत! या दौऱ्यात राज्यातील भाजपचे नेते पंतप्रधान मोदींना भेटतील. तेंव्हा केंद्र सरकारकडं अडकलेला जीएसटीसह (#GST) इतर सर्व प्रलंबित निधी राज्याला त्वरित देण्याची आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील, ही अपेक्षा!', असं आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यातील सिरम इनस्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लशीची आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटला आज सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त आहे. एवढंच नाही तर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे. शिवाय वाहतूक शाखेचे पोलीस सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर तैनात करण्यात आले आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: November 28, 2020, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading