मराठी बातम्या /बातम्या /पुणे /ईडीची नोटीस आणि पाऊस पडला तर समजा 'पप्पू पास हो गया', सुप्रिया सुळेंचा कानमंत्र

ईडीची नोटीस आणि पाऊस पडला तर समजा 'पप्पू पास हो गया', सुप्रिया सुळेंचा कानमंत्र


आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

'निवडणूक आल्या आहे. जे कुणी इच्छुक असेल, त्यांना सांगू इच्छिते की, राष्ट्रवादीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे'

पुणे, 28 सप्टेंबर : महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्री आणि आमदारांना ईडीच्या (ed) नोटीसाच नोटीसा मिळत आहे. अनेक मंत्र्यांच्या ईडीच्या कार्यालयात चक्करा सुरू आहे. तर, 'आगामी निवडणुकामध्ये जर कुणी इच्छूक असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला जर ईडीची नोटीस (ed summons) आणि पाऊस पडला तर शंभर टक्के सीट आपली आलीच समजा, असा कानमंत्रच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी दिला.

पुण्यातील  बावधन परिसरात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय टोलेबाजी करत आपल्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला.

'निवडणूक आल्या आहे. जे कुणी इच्छुक असेल, त्यांना सांगू इच्छिते की, राष्ट्रवादीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, दोन गोष्टी होतात एक तर ईडीची नोटीस आली असेल किंवा पाऊस पडला असेल तर आपली सीट शंभर टक्के निवडून येते' असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

तसंच,  'आता तिकीट कुणाला मिळेल मला माहिती नाही. पण इथं जे जे इच्छुक उमेदवार असतील आणि ते पाऊसामध्ये भिजले असेल तर समजो पप्पू पास हो गया है, नक्कीच आपल्याला आगामी काळात या भागातून गोड बातमी मिळेल' असा विश्वासही सुळेंनी व्यक्त केला.

कोरोना लस देण्याऐवजी दिला रेबीजचा डोस, ठाण्यात धक्कादायक घटना

'शेतकरी आंदोलन गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे.  पण केंद्र सरकार यात चर्चा ही करायला तयार नाही, हे केंद्र सरकार म्हणजे दडपशाहीचे सरकार आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

'ज्याला जे बोलायचं त्याला ते अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये. आता सिलेंडर आणि पेट्रोलचे भाव खूप वाढले आहेत, ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण केंद्र सरकारच्या विरोधात काही बोलले की कारवाई होते, हे दडपशाहीचे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कोरोना लसीकरणात महाराष्ट्रच अव्वल; देशात सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात पत्रकारांशी बोलत असतानाही सुप्रिया सुळे यांनी ईडीवरून भाजपवर निशाणा साधला होता.  'जो भाजपच्या विरोधात बोलेल किंवा केंद्र सरकार विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस दिल्या जात आहेत. ही आजकाल फॅशन झाली आहे. आधी ज्याप्रमाणे पोस्टातून कार्ड यायची त्याप्रमाणे आता ईडीकडून नोटिसा यायला लागल्या आहेत. हे या देशाचे दुर्दैव आहे', अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केली होती.

First published:
top videos