Home /News /pune /

मंदिरं उघडण्याच्या श्रेयवादावरून अमोल कोल्हेंचा भाजप नेत्यांना सणसणीत टोला, म्हणाले...

मंदिरं उघडण्याच्या श्रेयवादावरून अमोल कोल्हेंचा भाजप नेत्यांना सणसणीत टोला, म्हणाले...

'मंदिरं (Temples) जी काही उघडली गेली आहेत, त्यांनतर जी काही त्रिसूत्री आहे. तिचा अवलंब व्हावा अन्यथा आज जे श्रेय घ्यायला पुढे येतील यांच्यावरच हे खापर फुटू नये'

जुन्नर, 16 नोव्हेंबर :  मंदिर उघडण्याच्या (temples open) मुद्यावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) श्रेयवादाची लढाई सुरू आहे. पण 'श्रद्धेच्या बाबतीत  राजकारण होत तेव्हा ते नक्कीच दुर्दैवी आहे. श्रेय घ्यायला पुढे येतील यांच्यावरच हे खापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी' असा टोला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी लगावला. आज डॉ कोल्हे आपल्या नारायणगाव येथील जन्मगावी आले होते तेव्हा  News 18 लोकमत सोबत त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. 'कोरोनाच्या परीक्षा पाहणाऱ्या काळानंतर थोडासा एक मोकळा श्वास घेण्याची उसंत सगळ्यांना मिळालेली आहे. त्यामुळे घरच्यांसोबतच आपण ही दिवाळी साजरी केली. पण जरी सण असला, सणाचं मांगल्य असलं, सणाचा उत्साह असला  तरी सेलिब्रेशन या झोनमध्ये जाण्याची आपली खरंच मानसिकता नाही, असंही त्यांनी सांगितलं. भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला निरोप, शहीद ऋषिकेश जोंधळे अनंतात विलीन 'श्रद्धेच्या बाबतीत  राजकारण होत तेव्हा ते नक्कीच दुर्दैवी आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार ने जे काही निर्णय घेतले जे काही काम केल ते स्वागतार्ह होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे त्यांनी कौतुक केलं. आनंद साजरा करताना, सोशल डिस्टंन्सिग, मास्कचा वापरणे, हात धुणे ही त्रिसूत्री कायम आचरणात आणायला हवी तेव्हा कोविडंचं संकट संपेल. सण उत्सव असतील, मंदिरं उघडण्याचा सोहळा असेल या सर्व गोष्टीत हे पाळल जायला हवं, असं आवाहनही कोल्हे यांनी केले. 'मला या श्रेयवादाची कल्पना नाही आणि  त्यावर कोणाविषयी बोलावं असही मला महत्वाचं वाटतं नाही. मात्र, मंदिर जी काही उघडली गेली आहेत, त्यांनतर जी  काही त्रिसूत्री आहे. तिचा अवलंब व्हावा अन्यथा आज जे श्रेय घ्यायला पुढे येतील यांच्यावरच हे खापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. मुलं फटाके फोडत असताना तरुणावर सपासप कोयत्याचे वार, नाशिकमधील हत्येचा LIVE VIDEO शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत जे आपण  मार्गी लावणार आहात? यावर अमोल कोल्हे म्हणाले की, 'सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मतदारसंघातील एक फार महत्वाचा मुद्दा आहे. तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. निसर्ग चक्री वादळात  द्राक्ष बागायतदारांचे जे प्रचंड नुकसान झालं आहे की, जे डोळ्यांना न दिसणारं होतं. घडनिर्मितीच्या काळात द्राक्ष बागांच्या बागा फेल झाल्या आहेत.त्यासाठी दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.सातत्याने बळीराजावर  संकट येत राहीली आहेत. सातत्याने जो अवकाळी पाऊस सुरू होता  जे नुकसान झालं आहे त्यावर दिलासा देण्याचं मोठं काम करावं लागणार आहे.' क्रिकेट विश्व हादरलं! वर्ल्ड कप संघातील 21 वर्षीय युवा खेळाडूची आत्महत्या तुम्ही स्वतः डॉक्टर आहात सेकंड फेज किती  घातक  असेल? यावर कोल्हे म्हणाले की, 'नक्कीच ही काळजीची गोष्ट आहे. गणेशोत्सवानंतर रुग्ण वाढले होते. पुन्हा एकदा  काळजी घेतली गेली पाहिजे. युरोपातील काही देशात कोरोना वाढतोय. आपल्याकडेही दिवाळी नंतर पुन्हा एकदा खरेदीच्या निमित्तानं  लोक बाहेर पडलेत. अनेक ठिकानी सोशल डिस्टन्स पाळलं गेलं नाही अस पुढे आलं आहे. जेणेकरून येथून पुढच्या काळात जर आपल्यात आजाराची काही लक्षण दिसतं असतील  वेळेत त्याची बाधकता कमी करण्याची गरज आहे वेळेत उपचार करण्याची आहे.'
Published by:sachin Salve
First published:

Tags: भाजप

पुढील बातम्या