आधी या मातोश्रींनी खासदार अमोल कोल्हे यांची दृष्ट काढली. याचा व्हिडीओ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर करत मातामाऊली अशी काळजी घेतात तेव्हा आणखी बळ मिळतं! अशा भावना व्यक्त केल्या आहेत.मातामाऊली अशी काळजी घेतात तेव्हा आणखी बळ मिळतं! काल घाटात घोडी धरल्यावर माझे स्नेही शेखरदादा पाचुंदकर यांच्या मातोश्रींनी आधी दृष्ट काढली आणि परत असं धाडस करताना विचार कर अशी मायेची तंबीही दिली! pic.twitter.com/3qVA2dfu5d
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 17, 2022
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी (Bullock cart race) दिली आहे. यानंतर राज्यात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतींच आयोजन करण्यात येत आहेत. त्याच दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेला शब्द आज पाळला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं, बौलगाडा शर्यत पुन्हा सुरू करु आणि घोडीवर बसून बारी मारणार. 16 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यात आयोजित बैलगाडा शर्यतीत अमोल कोल्हे यांनी घोडीवर बसून बारी मारत आपला शब्द पाळला आहे. वाचा : मुंबई महानगरपालिकेची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस,वाचा काय आहे प्रकरण शिवसेनेच्या शिवाजी आढळरावांनी दिलं होतं आव्हान 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मी बैलगाडा स्पर्धा सुरू करून बैलगाडा घाटात घोडीवर बसण्याचा मान मिळवेल असं म्हटलं होतं. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आव्हान देत अमोल कोल्हे यांनी हे विधान केले होते. मात्र, बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतरही अमोल कोल्हे हे बैलगाडा शर्यतीत दिसून आले नाहीत. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2022 ला शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं.भिर्रर्रर्र..! कुलदैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आज घाटात घोडी धरली व भंडाराही उधळला! pic.twitter.com/YoffaLaa6S
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 16, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.