जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Breaking news : काल अजितदादांच्या शपथविधीला हजर असलेले राष्ट्रवादीचे आमदार आज शरद पवारांच्या गाडीत!

Breaking news : काल अजितदादांच्या शपथविधीला हजर असलेले राष्ट्रवादीचे आमदार आज शरद पवारांच्या गाडीत!

शरद पवार

शरद पवार

मोठी बातमी समोर येत आहे. काल अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले आमदार आज शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आले आहेत.

  • -MIN READ Satara,Satara,Maharashtra
  • Last Updated :

सातार, 3 जुलै :  मोठी बातमी समोर येत आहे. काल अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. मात्र काल अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपत घेताना जे आमदार हजर होते, त्यातीला काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आले आहेत. काल अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. मात्र आज हे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसून येत आहेत. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर आज शरद पवाराचं जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी कराडला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांचं आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात भव्य स्वागत केलं. शशिकांत शिंदे यांच्यासोबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि मकरंद पाटील हे देखील शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आले. मंत्री शरद पवारांची भेट घेणार?  दरम्यान दुसरीकडे काल अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते मंत्री शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. पवारांनी वेळ दिल्यास भेट घेणार असल्याचं या मंत्र्यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात