आमदार रोहित पवारांच्या कुटुंबातही आहे कोरोना योद्धा, केला खास सत्कार

आमदार रोहित पवारांच्या कुटुंबातही आहे कोरोना योद्धा, केला खास सत्कार

'राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे.'

  • Share this:

पुणे 30 मे: राज्यात कोरोनाविरुद्ध आज डॉक्टर्स आणि पोलीस निकराने लढाई लढत आहेत. त्यांच्या या लढ्याचं कौतुक सगळ्याच स्तरातून होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबातही एक कोरोना योद्धा आहे. रोहित यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिलीय. त्यांना भेटून सत्कार केला आणि माहिती जाणू घेतली असं सांगत, राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांच्या पत्नी कुंती यांची बहिण शिल्पा मगर या डॉक्टर आहेत. पुण्यात सिंहगड रोड, धायरी इथल्या नवले हॉस्पिटलमध्ये त्या कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत अशी माहिती त्यांनी दिलीय. आज आवर्जून त्यांना भेटून त्यांचा सत्कार केला. राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचीही घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत असणारा लॉकडाऊनचा हा टप्पा याआधी करण्यात आलेल्या लॉकडाऊनपेक्षा वेगळा असणार आहे. कारण या टप्प्यात निर्बंध शिथिल करत मोठी सूट देण्यात आली आहे. आंतरराज्य हालचालींवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसंच 8 जून नंतर कन्टेमेंट झोनशिवाय इतर भागातील मंदिर, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

अनेक दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांचे मोठे हाल होत होते. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्याची किंवा त्यामध्ये मोठी शिथिलता आणण्याची मागणी सातत्याने समोर येत होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवला असला तरीही त्यामध्ये मोठी सूट दिली आहे.

First published: May 30, 2020, 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading