मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

राष्ट्रवादीच्या लोकप्रिय आमदाराची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट

राष्ट्रवादीच्या लोकप्रिय आमदाराची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट

'आमदार भारत भालके यांची प्रकती अतिशय नाजूक आहे, पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे.  त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. '

  • Published by:  sachin Salve

पुणे, 27 नोव्हेंबर :  पंढरपूरचे (Pandharpur )राष्ट्रवादीचे (NCP) लोकप्रिय राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय भारत भालके (Bharat Bhalke) यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांची 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर पाच दिवसांनी 4 नोव्हेंबर रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ते घरी सुद्धा आले होते. पण काही दिवसांनी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना मागील आठवड्यात पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, गुरुवारपासून त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना किडनीचा आजार आणि मधुमेहाचा त्रास आहे.

भारत भालके यांची प्रकृती खालावल्यामुळे कार्यकर्ते चिंतातूर झाले आहे.  भालके यांच्या दिर्घायुष्यासाठी कुटुंबीयांनी आज सकाळी विठ्ठलाला साकडे घातले.  सोशल मिडियावर त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्येमुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहे. 'भालके उपचारांना प्रतिसाद देत असून लवकरच ते बरे व्हावे', यासाठी त्यांचे बंधू पंजाबराव भालके यांनी विठ्ठल-रुक्मिणीला साकडं घातले आहे.

दरम्यान,  'आमदार भारत भालके यांची प्रकती अतिशय नाजूक आहे, पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे.  आम्ही लक्ष ठेऊन आहोत', अशी माहिती रूबी हॉस्पिटलचे  डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी दिली.

भारत भालके हे हॅट्रिक आमदार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मागील 2019 निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली आणि जिंकली होती. तसंच  2009 साली पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांनी  पराभव करून ते जायंट क्लिर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता. 2002 पासून विठ्ठल सहकारी  साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून  आज तागायत काम पाहत आहे.

First published:

Tags: शरद पवार