VIDEO: आमदार बनसोडेंवर गोळीबार प्रकरण; एक दिवसापूर्वीच्या घटनेचं CCTV फूटेज होतय व्हायरल

VIDEO: आमदार बनसोडेंवर गोळीबार प्रकरण; एक दिवसापूर्वीच्या घटनेचं CCTV फूटेज होतय व्हायरल

NCP MLA Anna Bansode: राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या संदर्भात आता एक सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.

  • Share this:

पिंपरी, 12 मे: पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे (NCP MLA Anna Bansode) यांच्यावर आज भरदिवसा गोळीबार (firing) करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. सुदैवाने आमदार अण्णा बनसोडे हे या हल्ल्यातून बचावले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी व्यक्ती असलेल्या तानाजी पवार (Tanaji Pawar) याला ताब्यात सुद्धा घेतले आणि त्याच्याकडून पिस्तूलही जप्त केले आहे. मात्र, आता या प्रकरणाशी संबंधित एक सीसीटीव्ही फूटेज आणि ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल (CCTV footage, audio clip viral) होत आहे.

काय आहे या सीसीटीव्ही फूटेजमध्ये?

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज गोळीबार झाल्याची घटना घडली. ज्या तानाजी पवार नामक व्यक्तीने गोळीबार केल्याचा आरोप केला जातोय त्याला आमदार अण्णा बनसोडेच्या कार्यकर्त्यांनी काल बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. त्या मारहाणीचे सीसीटीव्ही फूटेज सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

वाचा: राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर भरदिवसा गोळीबार, थोडक्यात बचावले!

व्हायरल होणाऱ्या या सीसीटीव्ही फूटेजवरुन दावा करण्यात येत आहे की, आमदार अण्णा बनसोडेच्या कार्यकर्त्यांनी काल बेदम मारहाण करत आहेत. तसेच एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमदार अण्णा बनसोडे यांनी संबंधीत व्यक्तीला शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 12, 2021, 11:03 PM IST
Tags: NCPpune

ताज्या बातम्या