...इतकी आपली किंमत आहे का? अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

...इतकी आपली किंमत आहे का? अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

'महाराष्ट्रातील काही नेते हे काही पण बरगळायला लागली आहे. खास करून विरोधीपक्षातील नेते बोलत आहे. भाजपच्या नेत्यांनी तर खालच्या पातळी गाठली आहे.'

  • Share this:

पुणे, 22 नोव्हेंबर : 'राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखे आहे. पवारसाहेबांवर बोलण्या इतकी आपली किंमत आहे का? अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी भाजपचे  (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर (Chandrakant Patil) सडकून टीका केली आहे.

पुण्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी आपल्या शैलीत भाषण करत भाजप नेत्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं 'हे' उत्तर

'महाराष्ट्रातील काही नेते हे काही पण बरगळायला लागली आहे. खास करून विरोधीपक्षातील नेते बोलत आहे. भाजपचे नेते तर खालच्या पातळीला गेले आहे.  काहीजण अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहे. ज्यांना समाजामध्ये कवडीची किंमत नाही, अशे काहीजण बरगळत आहे, असं म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडले.

'महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाची परंपरा आहे पण काहीजण राजकारण करत आहे. आपण कोणाबद्दल काय बोलतो हे विरोधी पक्षाच्या काही लोकांना कळत नाही आहे' अशी टीकाही अजितदादांनी केली.

...तर 20 लाख मुलांचा होऊ शकतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात Unicef चा इशारा

'कोरोना आजारावर कोणतीही लस आलेली नाही. रोज बातम्या ऐकतोय लस आलीये, उद्या येणार आहे. इथं माणूस मरायला टेकला आहे. यांची लस अजून यायला तयार नाही. पण, खबरदारी बाळगा, अजून लस आलेली नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी', असं आवाहनही अजित पवार यांनी केले.

'अहमदाबादमध्ये रात्रीचे लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितींचा आढावा घेतला जात आहे. आणखी 10 ते 15 दिवस राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल', असंही अजित पवार म्हणाले.

राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का? असा सवाल केला असता अजितदादा म्हणाले की, 'परिस्थिती कशा प्रकारची समोर येणार हे त्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आताच मी काही घोषणा करणे योग्य ठरणार नाही. मी आज काही बोललो तर लोकं जास्त त्रस्त होतील. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती आणि कशी वाढते यावर पुढचा निर्णय अवलंबून असणार आहे.'

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, देवेंद्र फडणवीसांनी दागली टीकेची तोफ

'कोरोनाची खबरदारी घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे जे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. ते सेंटर तातडीने सुरू करता येईल. व्हेंटिलेटर बेड, साधे बेड हे खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते, आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर पूर्ण क्षमतेनं सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल', असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Published by: sachin Salve
First published: November 22, 2020, 4:25 PM IST

ताज्या बातम्या