Home /News /pune /

बिहारच्या निकालांबद्दल शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

बिहारच्या निकालांबद्दल शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

'बिहारमध्ये तेजस्वी आणि नितीश कुमार यांच्यातच थेट लढत होती. त्यामुळे आम्ही तिथे काही फारसं लक्ष घातलं नाही. तेजस्वी यादवला आम्ही मोकळीक दिली होती.'

पुणे 10 नोव्हेंबर: बिहारच्या निकालांवरून (Bihar Election Result) देशभर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्व निकाल जाहीर व्हायला रात्री उशीर होणार असला तरी स्पष्ट कल आता जाहीर झाले आहेत. राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बिहारवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार म्हणाले, बिहारमध्ये तेजस्वी आणि नितीश कुमार यांच्यातच थेट लढत होती. त्यामुळे आम्ही तिथे काही फारसं लक्ष घातलं नाही. तेजस्वी यादवला आम्ही मोकळीक दिली होती असंही पवारांनी सांगितलं. तेजस्वी यादवने ज्या प्रकारे लढत दिली ती युवकांसाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे. नितीश कुमारांच्या जेडीयूला मोठा फटका बसेल असेलं असं बोललं जात होतं मात्र तसं होताना दिसत नाही असंही ते म्हणाले. भाजपला या निवडणुकीत चांगला फायदा झाला असं मतही त्यांनी व्यक्त केलं. बिहारमध्ये भाजपला देवेंद्र फडणवीसांमुळे फायदा झाला असं म्हटलं जातं, तुमचं मत काय आहे असा प्रश्न विचारल्यावर पवार आपल्या खास शैलीत म्हणाले,  देवेंद्र फडणवीसांमुळे चमत्कार झाला हा प्रकाश तुमच्यामुळे आमच्या डोक्यात पडला. पुण्यातल्या हडपसर येथे अॅमनोरा पार्क टाऊन मधल्या चतुर्भुज नरसी शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. बिहारमध्ये भाजपनं खेळली 'ही' चाल, या मतदार संघात झाला फायदाच फायदा! दरम्यान,  बिहार निवडणूक (Bihar Assembly Election 2020 Result) अनेक अर्थांनी राजकीय ट्रेंड सेटर ठरू शकते. आतापर्यंत स्पष्ट कल नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली NDA ला मिळालेला दिसतो. पण तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनसुद्धा फार मागे नाही. त्यामुळे लढाई कमालीची चुरशीची होत आहे. पण आघाडी आणि गठबंधनापलीकडे जाऊन प्रत्येक पक्षाची कामगिरी स्वतंत्रपणे जोखली तर मुख्यमंत्रिपदाचे दोन्ही दावेदार निष्प्रभ ठरू शकतील, अशी परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता अधिक आहे. बिहार निवडणूक निकालांच्या आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यांवरून सर्वात जास्त स्ट्राइक रेट डाव्यांनी (Left parties in Bihar) मारला आहे. त्याखालोखाल भाजपची कामगिरी (BJP seats in Bihar) चांगली आहे. IPL 2020चा विजेता की बिहारचा ‘बिग बॉस’, कुणाचा निकाल लागणार पहिले? मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूची कामगिरी सर्वात सुमार झाली आहे आणि राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांच्या पक्षाची कामगिरीही फार चांगली झालेली नाही. गेल्या निवडणुकीपेक्षा या दोन्ही पक्षांना कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या