सायरसने शाळेत झोपायला चक्क कॉटच आणला, शरद पवारांनी सांगितले मित्राचे धम्माल किस्से!

सायरसने शाळेत झोपायला चक्क कॉटच आणला, शरद पवारांनी सांगितले मित्राचे धम्माल किस्से!

शाळेत असताना आम्हाला 36 टक्के गुण मिळायचे फार तर 40 टक्के. मात्र जीवनाच्या परीक्षेत आम्ही यशस्वी झालो.

  • Share this:

अव्दैत मेहता, पुणे 16 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची स्मरणशक्ती किती तल्लख आणि अचूक आहे याचा प्रत्यय आज पुण्यात पुन्हा एकदा आला. निमित्त होतं कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळांना सायरस पूनावाला आणि विलू पूनावाला अशी नावे शाळांना देण्याचं. यावेळी शरद पवारांनी आपले खास मित्र असलेल्या सायरस पूनावाला यांच्या मैत्रीचे धम्माल किस्से सांगितले आणि शाळेतली सगळीच मुलं पोट धरून हसायला लागली. त्याचबरोबर पवारांनी मुलांना फक्त मार्क्स मिळवणं म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं नाही. तर जीवनाच्या शाळेतही तुम्ही यशस्वी झालं पाहिजे असं सांगत आपल्या आठवणी सांगितल्या. ख्यातनाम उद्योगपती आणि सिरम संस्थेचे प्रमुख सायरस पुनावाला हे शरद पवारांचे खास मित्र. त्यांचं नाव शाळेला देण्याच्या कार्यक्रमात खुद्द पवारच पाहुणे असल्याने त्यांनीही आपल्या मित्राचे किस्से सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पवार म्हणाले, सध्या 10वी आणि 12वी परीक्षांच्या निकालांची चर्चा असते कारण विद्यार्थ्यांना 94, 96 टक्के गुण मिळतात. हे गुण मिळवणं हे चांगलं आहे. त्याचा आनंद आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं कौतुक केलं पाहिजे. मात्र निकालाची टक्केवारी का वाढली याच्या खोलात गेलं पाहिजे. शाळेत असताना आम्हाला 36 टक्के गुण मिळायचे फार तर 40 टक्के.

फडणवीसांच्या या योजनेला मात्र उद्धव ठाकरे राज्यभर पोहोचविणार

40 टक्के मिळालेतरी खूप अशी भावना होती मात्र जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झालो. सायरस आणि मी दोघे एकाच कॉलेजात होतो. अभ्यास सोडून इतर विषयातच आम्हाला रस होता. त्यामुळं 4 ऐवजी 5 वर्ष लागली. पण दोघेही आपापल्या क्षेत्रात देशात देशाबाहेर पोचलो. सिरमइन्स्टिट्यूटने भारताचे नाव जगभर केलं लस निर्मिती क्षेत्रात पुण्याचं नाव जगभर झालं ते सायरस पूनावाला यांच्या सिरम संस्थेमुळं.

हे सगळं करणारे डॉ. सायरस पूनावाला म्हणजे कोणतीही जाहिरातबाजी वा सेवेचं प्रदर्शन न करता मानवजातीचे आरोग्यहीत जपणारे आणि त्यातूनही व्यवसाय वृद्धिंगत करणारे आगळे आणि विरळे कर्मोद्योगी आहेत. pic.twitter.com/M49FrmocIq

— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 16, 2019

mhak-424365.html">लग्नानंतर पहिल्यांदाच साई दर्शनाला आलेल्या राणी मुखर्जीला अश्रू अनावर

पवार पुढे म्हणाले, शाळेत झोपायची सवय असलेल्या सायरस यांनी झोपायला चक्क कॉट आणला होता हा किस्सा खास शैलीत सांगत धम्माल उडवली. ते म्हणाले, सायरस पूनावाला शाळेत झोपायचे. शिक्षिकेने सांगितलं तुमचा फर्निचरचा व्यवसाय आहे उद्या कॉट घेऊन या शाळेत झोपायला. आणि दुसऱ्या दिवशी सायरस खरेच कॉट घेऊन आले. विद्यार्थी खो खो हसू लागले. शिक्षिकेने विचारलं तर हे म्हणाले तुमचीच आज्ञा होती. मी आज्ञाधारक विद्यार्थी आहे.

तर सायरस पूनावाला यांनी काँग्रेसच्या राजकारणामुळे शरद पवार हे क्षमता असतानाही पंतप्रधान होऊ शकले नाहीत याबद्दल खंत व्यक्त केली

Published by: Ajay Kautikwar
First published: December 16, 2019, 9:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या