Home /News /pune /

प्रवीण दरेकर, महिलांची माफी मागा नाहीतर थोबाड रंगवू, रुपाली चाकणकरांचा थेट इशारा

प्रवीण दरेकर, महिलांची माफी मागा नाहीतर थोबाड रंगवू, रुपाली चाकणकरांचा थेट इशारा

'प्रवीण दरेकर आपण वरिष्ठांच्या सभागृहातील विरोधीपक्ष नेते आहात.पण, तुमच्या वैचारिकत्ता आणि अभ्यासाशी दूर दूर काही संबंध नाही'

मुंबई, 13 सप्टेंबर : 'तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा राष्ट्रवादीच्या (ncp) नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांना दिला आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असं म्हणत प्रवीण दरेकरांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या टीकेला रुपाली चाकणकर यांनी जशास तसे उत्तर दिले. भारताने 13 दिवसांत दिले तब्बल 10 कोटी डोस, WHO ने केलं कौतुक 'प्रवीण दरेकर आपण वरिष्ठांच्या सभागृहातील विरोधीपक्ष नेते आहात. हे वरिष्ठ आणि ज्येष्ठांचं सभागृह आहे. पण, तुमच्या वैचारिकत्ता आणि अभ्यासाशी दूर दूर काही संबंध नाही' असा सणसणीत टोला चाकणकर यांनी दरेकरांना लगावला. लग्नातच नवरीबाईला 'जोर का झटका'! नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून उडालीच; VIDEO VIRAL तसंच, 'राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं तुम्ही म्हणाला, पण प्रवीणजी तुम्ही आणि तुमच्या पक्षात महिलांबद्दल नेहमी दुय्यम वागणूक देण्याची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून ती घाण टपकत आहे. ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. आपल्या पक्षातील काही नेत्या आहे, त्यामुळे तुम्ही महिलांच्या कैवारी आहे, असं दाखवताय. त्यामुळे आज तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला. काय म्हणाले प्रवीण दरेकर? आज आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 230 वी जयंती. या निमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रवीण दरेकर उपस्थित होते.  दरम्यान, लवकरच शिरुरमधील लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे. या प्रवेशावर नाव न घेता, 'राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे' अशी टिपण्णी दरेकरांनी केली होती. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे, असल्याचा गंभीर आरोपही दरेकरांनी केला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, NCP, Pravin darekar

पुढील बातम्या