राष्ट्रवादीचे हे नेते म्हणाले.. शरद पवारांनी माझा राजकीय पुनर्जन्म केलाय

राष्ट्रवादीचे हे नेते म्हणाले.. शरद पवारांनी माझा राजकीय पुनर्जन्म केलाय

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यही महात्मा फुले यांच्याच विचारांचे आहे. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे आज राज्याची धुरा हाती घेत आहेत,

  • Share this:

पुणे,28 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कामही सत्यशोधक चळवळीचा वारसा चालवणारेच आहे. समता परिषदेलाही त्यांची नेहमीच साथ लाभली, म्हणून आजही मी त्यांच्यासोबत आहे. पवार साहेबांचा कालच फोन करून तुम्ही मंत्री होणार असल्याचे सांगितले. शरद पवारांनी माझा राजकीय पुनर्जन्म केला, अशा शब्दांत भुजबळ यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. हे सरकार किमान समान कार्यकमानुसारच चालेल. तशा स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आघाडीमध्ये जे खातं मिळेल, ते सांभाळणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यही महात्मा फुले यांच्याच विचारांचे आहे. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे आज राज्याची धुरा हाती घेत आहेत, याचा आनंद होत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. अडचणीच्या काळात सगळ्यांनी साथ दिलेल्याबद्दल भुजबळांनी आभार मानले.

महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त पुण्यातील फुले वाड्यात आयोजित फुले समता पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मुक्ता टिळक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित आहेत.

समता परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एक लाख मानपत्र, मानचिन्ह, फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फादर दिब्रिटो हे उस्मानाबाद येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

फादर दिब्रिटो हे नुसतेच फादर नाहीत, ते अस्सल मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा समतेचा विचार खूप महत्त्वाचा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. फादर दिब्रिटो यांच्या हातात फक्त बायबलच नाही तर ते तुकोबांची गाथाही वाचून तिचा परदेशात प्रसार करतात. फादर दिब्रिटो हे समतेचाच पुरस्कार करतात म्हणून त्यांना हा समतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महात्मा फुले यांनी ब्राह्मणांचाही कधीच द्वेष केला नाही, उलट त्यांच्या मुलांचा सांभाळ केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 03:24 PM IST

ताज्या बातम्या