जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / NCP : प्रदेशाध्यक्ष बदलणार का? शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुख यांचं मोठं वक्तव्य

NCP : प्रदेशाध्यक्ष बदलणार का? शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुख यांचं मोठं वक्तव्य

अनिल देशमुख

अनिल देशमुख

राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्षपद बदलाबाबत हालचाली सुरू झाल्याचं समोर येत आहे. आज अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 2 जुलै, चंद्रकांत फुंदे : मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्याला संघटनात्मक जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. अजित पवार यांच्या या मागणीवर पक्षातील नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान आता राष्ट्रवादीमधील हालचालींना वेग आला आहे. आज राज्यातील सर्व आमदारांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी पावसाळी अधिवेशन आणि प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया  दरम्यान दुसरीकडे आज राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत शरद पवार हेच अंतिम निर्णय घेतील. अजितदादांना काही आमदार भेटल्याचं माझ्याही कानावर आलंय. पण आमच्या पक्षात साहेबच सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतात. असं देशमुख यांनी म्हटलं आहे. मोठी बातमी! राष्ट्रवादीमध्ये पुन्हा हालचालींना वेग, अजितदादांनी  सर्व आमदार, जिल्हाध्यक्षांना तातडीनं मुंबईत बोलावलं शरद पवारांनी बोलावली बैठक शरद पवार यांनी सहा जुलैला राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रदेशाध्यपदाबाबत निर्णय होऊ शकतो अशी चर्चा आहे. पक्षातील सर्व नेत्यांसोबत बोलून अजित पवार यांच्या मागणीवर निर्ण घेऊ असं  शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता सहा जुलैला शरद पवार यांनी बैठक बोलावल्याणं चर्चेला उधाण आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात