VIDEO : पुण्यात अजित पवारांची हटके स्टाईल, पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधीच सुरू केली फवारणी

VIDEO : पुण्यात अजित पवारांची हटके स्टाईल, पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधीच सुरू केली फवारणी

अजित पवारांच्या या कृतीनंतर तिथं उपस्थित पत्रकारांनाही अनपेक्षित धक्का बसल्याने त्यांनाही हसू आवरलं नाही.

  • Share this:

पुणे, 23 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या अनोखी स्टाईल आणि शिस्तीसाठी ओळखले जातात. मास्क न घातल्याने पत्रकाराला खडेबोले सुनावणं असो की दालनात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी थेट आडवी पट्टी बांधणं असो...जे वाटतं ते बेधडकपणे करताना अजित पवार कोणाचीच पर्वा करत नाहीत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यात आला आहे.

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार बूमसह पुढे सरसावले. मात्र कोरोनाबाबत काळजी म्हणून अजित पवार यांनी स्वत:च्या हातातील सॅनेटायझरद्वारे थेट पत्रकारांनी ठेवलेल्या बूमवरच फवारणी केली. अजित पवारांच्या या कृतीनंतर तिथं उपस्थित पत्रकारांनाही अनपेक्षित धक्का बसल्याने त्यांनाही हसू आवरलं नाही.

पुण्यात अजित पवार नेमकं काय म्हणाले?

ई-पास

'ई पास बाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल. गृहमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्र देशाला डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेत आहे,' असं म्हणत केंद्र सरकारने ई-पासची सक्ती हटवण्याबाबत निर्देश दिल्यानंतर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'कशाला दाऊद-दाऊद करता...'

'अरे कशाचा दाऊद दाऊद करत बसला. काहीतरी कोणीतरी टीव्हीला दाखवतं. काल दाखवलं दाऊद पाकिस्तानमध्ये आज दाखवलं दाऊद आमच्याकडे नाही. तो एका दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. वातावरण खराब करण्याचं काम त्या टोळीने केलं आहे. केंद्र आणि संबंधित अधिकारी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. ते सक्षम आहेत, आम्ही त्यात वक्तव्य करणं बरोबर नाही,' असं अजित पवार म्हणाले.

Published by: Akshay Shitole
First published: August 23, 2020, 9:36 PM IST

ताज्या बातम्या