पुणे, 08 जानेवारी : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी आपल्याच पक्षाचा प्रवक्त्याला भर गर्दीत झापल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ' काम करू की सत्कार स्वीकारू' असा दमच अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भरला.
पुण्यात कौन्सिल हॉल येथे बैठकीसाठी अजित पवार आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. गुंठेवारीचा विषय मंजूर केल्यानं काही गावकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आले होते. त्यामुळे अजितदादा कमाली संतापले होते. त्यांनी भर गर्दीतच 'मी तिथे जाऊन रद्द करीन, तुम्ही सांगितले म्हणून आम्ही काम करतोय ना. आम्हालाही नकोय का सरकार, काम करू की सत्कार स्वीकारू' असं म्हणून झापून काढले.
तसंच ' गुंठेवारीला मंजुरी दिली आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत घड्याळ चालवा, असंही अजितदादा म्हणाले.
दरम्यान, 'चंद्रकांत पाटील यांनी काय विधान केले माहिती नाही, मी कोरोना बाबत बैठक घेतली, त्यात आढाव्यासोबतच इतर काही निर्णय घेतले आहेत. गुंठेवारीचा विषय कॅबिनेटला होता,अनेक गावे पुण्यातील होती. तसा निर्णय घेण्यात आला, त्याचा लोकांना फायदा होईल तसंच महसूलही मिळेल' असं पवार म्हणाले.
Small Investment Business: फक्त दहा हजारांत सुरू करा हा व्यवसाय; होईल मोठी कमाई
'महापालिका निवडणूक समोर ठेवून निर्णय घेता येत नसतात, निवडणूका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला यात तथ्य नाही. 11 गावाचा टॅक्स विषय महापालिकेचा आहे, त्यातील लोकांचा आहे. याचा तोटा असेल तर नगरविकास खात्याला यात हस्तक्षेप करता येतो' असंही अजित पवार म्हणाले.
माणुसकी जिंदाबाद! बायकरने रिक्षावाल्याला केलेली मदत पाहून सेहवाग खुश
'कुठल्या पक्षात कोण प्रवेश करत आहे. हे मीडियाला वेळोवेळी माहिती होईल. पुण्यात होईल किंवा दुसरीकडे होईल तसे त्या पक्षाचे प्रवक्ते सांगतील. मेहबूब शेख प्रकरण तपास सुरू आहे, त्यात काही आतापर्यंत आढळलेले नाही. पण दोषी असेल तर कारवाई होईल, पण कोणी विनाकारण बदनामी करत असेल त्यांच्यावरही कारवाई होईल' असा इशाराही पवारांनी दिला.