• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • मुख्यमंत्र्यांच्या मनात चाललंय काय? अजितदादांना पडलं कोडं, म्हणाले...

मुख्यमंत्र्यांच्या मनात चाललंय काय? अजितदादांना पडलं कोडं, म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी 'भावी सहकारी' वक्तव्य केल्यामुळे भाजप (bjp) आणि सेना (shivsena) युतीच्या चर्चेला ऊत आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी 'भावी सहकारी' वक्तव्य केल्यामुळे भाजप (bjp) आणि सेना (shivsena) युतीच्या चर्चेला ऊत आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी 'भावी सहकारी' वक्तव्य केल्यामुळे भाजप (bjp) आणि सेना (shivsena) युतीच्या चर्चेला ऊत आला आहे.

  • Share this:
पिंपरी चिंचवड, 18 सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी 'भावी सहकारी' वक्तव्य केल्यामुळे भाजप (bjp) आणि सेना (shivsena) युतीच्या चर्चेला ऊत आला आहे. राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय, असा प्रश्न पडला आहे. पण, 'आमचं मस्त चाललंय, महाविकास आघाडी सरकारचा कारभार व्यवस्थितीत सुरू आहे', असंही अजितदादांनी सांगून गुगली टाकली. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीमध्ये डॉ. डी.वाय.पाटील ज्ञानशांती शाळेचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी सतेज पाटलांना (satej patil) टोला लगावला. 'गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे वय 50 झाले तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलंय, किती दिवस काँग्रेस त्यांना राज्यमंत्री ठेवणार' अशी कोपरखळी अजित पवार यांनी सतेज पाटील यांना टोला लगावली. मृत्यूनंतरही आईने लेकीचा हात सोडला नाही, दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार 'चंद्रकांत पाटील (chandrakant patil) बहुतेक केंद्रात मंत्री होणार असतील म्हणून ते अशी विधानं करत आहे. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादेत काय बोलले हे अद्याप समजू शकलं नाही. त्यांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही, पण सध्या आमचे सरकार व्यवस्थितीत चालू आहे. त्यामुळे मी त्या विधानाला विशेष महत्व देत नाही, असं अजित पवार  म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहे. मात्र इलेक्टिव्ह मेरिटवर प्रवेश दिला जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. क्या बात (स्वाद) है जिंदगी मे! कॅडबरीची ती जाहिरात आठवत असेल तर हा VIDEO पाहाच जरंडेश्वर कारखाना कारवाई संदर्भात बोलताना त्याचा तपास ईडी करत आहे त्यातून सत्य बाहेर येईल, असं सांगतानाच छगन भुजबळांवर ही आरोप झाला होता, त्यातून ते निर्दोष मुक्त झाले पण त्यांची दोन वर्षे तुरुंगात गेली त्याचे काय असंही ते म्हणाले. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, "व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी" असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत. जाहीर व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
Published by:sachin Salve
First published: