अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांबाबत केला खुलासा, शिवसेनेलाही दिले प्रत्युत्तर

अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांबाबत केला खुलासा, शिवसेनेलाही दिले प्रत्युत्तर

हातची सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील त्यांचे दु:ख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.

  • Share this:

पुणे,27 डिसेंबर: सध्या मी साधा आमदार असल्याने प्रोटोकॉलनुसार स्वत:हून जागा बदलून घेतली होती. थेट मुख्यमंत्र्यांशेजारी बसणे प्रोटोकॉलला धरून नव्हते. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या नावाची पाटी बदलल्याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी खुलासा केला आहे. हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हातची सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील त्यांचे दु:ख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाया मरत नाही, असा शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील खोचक टीका केली. विजयसिंह मोहितेंवर बोलण्यास मात्र अजित यांनी नकार दिला.

शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा कोणताही वाद नाही. सर्वांना माहीत हे की हे महाविकास आघाडीचे सरकार आहे, असे सांगत शिवसेनेच्या पोस्टरबाजीवर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याची अजित पवार यांनी यावेळी माहिती दिली.

अजित पवारांनी बदलली नावाची पाटी अन् सभेत पिकला हशा

दरम्यान, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा दोन दिवसांपूर्वी पुण्यात पार पडली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगलाच हशा पिकवला. व्यासपीठावर बसताना अजित पवार यांनी शेजारी असलेल्या नावाची पाटी बदलून हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची पाटी ठेवली. हर्षवर्धन पाटील यांना त्यांना आपल्या शेजारी बसवून घेतले होते. हे पाहून त्यांच्या समोर बसलेले सभासद हसून-हसून लोटपोट झाले होते. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहीत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकीटवाटपावरून हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली.

विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. त्यामुळे आधीच पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन नेत्यांमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला. मात्र आजच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी नावाची पाटी बदलून हर्षवर्धन पाटील यांना जवळ बसवले आणि क्षणात हे वातावरण बदलले, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

सुरुवातीला नावाच्या पाट्या बघून नेते बसत असतानाच अजित पवार पुढे आले आणि त्यांनी नावाच्या पाट्या बघितल्या. त्यात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये कल्लपण्णा आवाडे यांच्या नावाची पाटी होती. ती पाटील अजित पवार यांनी बदलून हर्षवर्धन पाटील यांची पाटी शेजारी घेतली आणि नंतर मागोमाग आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना शेजारी बसवून घेतलं. तसंच नंतर त्यांच्याशी गप्पाही मारल्या. संपूर्ण कार्यक्रमात हाच चर्चेचा विषयही झाला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर 8 महिन्यांच्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या सर्व साधारण सभेच्या निमित्ताने विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांना भेटले. मोहिते पाटील यांना स्टेजवर पाहताच शरद पवार यांनीही त्यांना जवळ बसवून घेतलं आणि त्यांच्यात बराच वेळ चर्चाही झाली.

Published by: Sandip Parolekar
First published: December 27, 2019, 2:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading