• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • Pravin Darekar यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्याविरोधात NCP कडून पुण्यात FIR दाखल

Pravin Darekar यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्याविरोधात NCP कडून पुण्यात FIR दाखल

NCP files complaint against Pravin Darekar: प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

  • Share this:
पुणे, 22 सप्टेंबर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhgad Police Station) तक्रार दाखल करणअयात आली आहे. प्रवीण दरेकर यांनी 13 सप्टेंबर रोजी एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये रुपाली चाकणकर म्हणाल्या, "प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी.... कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दखल केले आहे". चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस पाठवणार, सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार - संजय राऊत काय आहे संपूर्ण प्रकरण? 13 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रवीण दरेकर उपस्थित होते. दरम्यान, लवकरच शिरुरमधील लावणी कलाकार सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावर भाष्य करताना दरेकरांनी टीका केली होती. या प्रवेशावर नाव न घेता, 'राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे' अशी टिपण्णी दरेकरांनी केली होती. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे, असल्याचा गंभीर आरोपही दरेकरांनी केला होता. रुपाली चाकणकरांनी दिलेला इशारा 'तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना दिला होता. 'राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं तुम्ही म्हणाला, पण प्रवीणजी तुम्ही आणि तुमच्या पक्षात महिलांबद्दल नेहमी दुय्यम वागणूक देण्याची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून ती घाण टपकत आहे. ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. आपल्या पक्षातील काही नेत्या आहे, त्यामुळे तुम्ही महिलांच्या कैवारी आहे, असं दाखवताय. त्यामुळे आज तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी होता. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यावर आता प्रवीण दरेकर काय प्रतिक्रिया देता हे पहावं लागेल.
Published by:Sunil Desale
First published: