Home /News /pune /

महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे! महाविकास आघाडीला जनतेनं स्वीकारलं, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे! महाविकास आघाडीला जनतेनं स्वीकारलं, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

धुळे-नंदुरबारमधील निकालाचं आश्चर्य नाही. मात्र इतर ठिकाणी पुणे, नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेलं यश महत्त्वाचं आहे.

पुणे, 4 नोव्हेंबर: धुळे-नंदुरबारमधील निकालाचं आश्चर्य नाही. मात्र इतर ठिकाणी पुणे (Pune), नागपुरात (Nagpur) महाविकास आघाडीला मिळालेलं यश महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच एकत्रित येऊन वर्षभर केलेलं काम लोकांनी स्वीकारलं आहे. महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. त्याला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. विनोदी विधाने करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकिक आहे, असा खोचक टोला देखील शरद पवारांनी लगावला. शरद पवार म्हणाले, मागच्या वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी विधानसभेला पुण्यातील सुरक्षित मतदार संघ निवडला, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. चंद्रकांत पाटलांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे ते जे बोलतात त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका पवार यांनी केली. हेही वाचा...नागपुरात भाजपला जबर धक्का, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा धुळे, नंदुरबार निर्णय हा काय अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते तेच त्याच्या हाती मिळालं. तो त्यांचा खरा विजय नाही. गेल्या वर्षभर काम करून दाखवलं. यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. तो कॉग्रेसनं जिंकला. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकास आघाडीचा सर्वात मोठा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारनं एकत्र काम केलं त्याचं हे यश असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. पुणे मतदारसंघतही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारला त्यापेक्षा वेगळा निकाल आला आहे. महाराष्ट्रतील चित्र बदलतं आहे. सर्व उमेदवाराचे अभिनंदन करत शरद पवार यांनी जनतेचे आभार मानले आहेत. त्यांना विश्वास असता तर मतदारसंघ निवडला नसता... शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांना विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे. चंद्रकांतदादा मागच्या वेळेस विधानपरिषदेला कसे निवडून आले. गेल्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते. त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळेच पुणे शहरातील त्याच्या सोयीचा मतदारसंघ निवडला. त्यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ निवडला नसता, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला. पुण्यात भाजपचा गड ढासळला दरम्यान, दुसरीकडे पुण्यातही भाजपचा गड ढासळला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांची पराभव करत 48 हजार 824 हजारांच्या मताधिक्यानी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना एकूण 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मिळाली. हेही वाचा...शीतल आमटेंच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांसमोर उभं राहिलं मोठं आव्हान औरंगाबादेत सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करत सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे. सतीश चव्हाण यांना 1 लाख 18 हजार 638 मते मिळाली तर शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण वैध मते 2 लाख 18 हजार 816 तर 23092 मते बाद ठरली. सतीश चव्हाण यांनी विजय मिळवताच आघाडी घेताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. मतमोजणीच्या आणखी दोन फेऱ्या शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होत्या.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Pune, Pune news, Sharad pawar

पुढील बातम्या