• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Sharad Pawar यांनी केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची पुण्यात घेतली भेट

Sharad Pawar यांनी केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची पुण्यात घेतली भेट

Sharad Pawar and Nitin Gadkari meeting in Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी त्यांची भेट घेतली.

 • Share this:
  पुणे, 2 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये भेट झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यात बैठक झाली आहे. पुणे विमानतळावर (Pune Airport) दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार गिरीश बापट, सुनील तटकरे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटले, मुंबई-गोवा महामार्गाची जी काही चाळण झाली आहे त्यामध्ये पळसपा ते इंदापूर हा रस्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून विकसित होत आहे. त्या ठिकाणी डंबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाचं काम घेण्यात यावं. त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी अधिक लागेल. असं मी गडकरींसमोर मत मांडलं. यावर गडकरींनी 5 ऑक्टोबर रोजी एक उच्चस्तरीय बैठक दिल्लीत आयोजित केली आहे. यावेळी पनवेल - इंदापूर महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला व पुण्यातील इतर विकासकामांविषयी चर्चा केली. गडकरींच्या घरासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी कामाचा धडका लावत देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवले आहे. परंतु, त्यांच्या जिल्ह्यातील नागपूरमध्ये रस्ते दुरुस्त न केल्याच्या कारणावरून एका इसमाने गडकरी यांच्या घरोसमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विजय पवार असं पीडित व्यक्तीचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्याने नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घरासमोर आत्महदहनाचा प्रयत्न केला. विजय पवार याने गडकरी यांच्या नागपूर निवासस्थानासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पवार याने गडकरी यांना विनंती केली होती की रस्ते व रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावे. याबद्दल त्याने निवेदनही गडकरींना दिलं होतं. एवढंच नाहीतर विजय पवार याने महाराष्ट्राच्या खराब रस्त्यांची अवस्था सुधारले नाहीत तर आत्मदहनाचा इशाराही याआधी दिला होता. अजितदादांना सकाळी - सकाळी नितीन गडकरींचा फोन आला आणि म्हणाले... पुण्यात 24 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दोन उड्डाणपुलांचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील सुद्दा उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, "मला मध्यंतरी गडकरींनी सांगितलं होतं मी मुंबईत येतो... उद्धवजी ठाकरे साहेब, तू, अशोक चव्हाण, स्वत: गडकरी साहेब आणि त्यांची अधिकाऱ्यांची टीम... राज्य सरकारमधील काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत किंवा दोगांच्या समन्वयातील प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे. त्याबाबतची मिटींग लावा. काल मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, उद्या गडकरी साहेबांसोबत दोन कार्यक्रम आहेत. सीएम साहेबांनी सांगितलं, गडकरी साहेबांना जी वेळ सोईची आहे ती सांगावी, सह्याद्रीवर तशी मिटींग आयोजित करु."
  Published by:Sunil Desale
  First published: