पुणे, 22 जानेवारी : पर्वती येथील शाहू कॉलेजच्या आवारातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या संकुलात स्थापन करण्यात आले आहे. येथील डीएसटी प्रयास शाळा,रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन व हेरीटेज क्लबच्या लोगोचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे हस्ते करण्यात आले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे आणि एस एम ई चेंबर ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाला शरद पवारांनी तरुणाईला मार्गदर्शन करत मोलाचा सल्ला दिला.
काय म्हणाले शरद पवार -
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध व संशोधनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहाण्याची संधी मिळाली आहे. म्हणून फायदा तरुण पिढीने घ्यावा. मात्र, तरुणांनी यासाठी जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवणे गरजेची आहे, असा सल्ला शरद पवार यांनी तरुणाईला दिला.
ते पुढे म्हणाले की, नवीन पिढीला तयार करताना तंत्रज्ञाच्या आधाराची गरज आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी ते विविध संशोधन करून विकास करतील. यासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्टार्टअप व अन्य योजनांमुळे 80 टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी होणार आहे. संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे देशाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणांना नक्कीच यश मिळेल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार का? आदित्यनी थेटच सांगितलं
दरम्यान, नवीन उद्योग व्यावसाय सुरू करण्यासाठी आम्ही विविध स्तरावर प्रयत्न करत आहोत. स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नवीन उद्योजकांना संस्थेमार्फत सातत्याने प्रोत्साहन देत आहोत, अशी माहिती सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Job, Sharad Pawar