मराठी बातम्या /बातम्या /पुणे /शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, काय आहे कारण?

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, काय आहे कारण?

file photo

file photo

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 8 जानेवारी : राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर आले आहे. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उद्घाटन समारंभ होत आहे. या कार्यक्रमाला शरद पवार आणि दोन्ही एकाच मंचावर उपस्थित आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे.

हेही वाचा - मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर, संजय राऊतांचा शब्द खरा ठरला!

शरद पवारांची टीका अन् फडवीसांचे प्रत्युत्तर - 

सत्ता आल्यानंतर नेत्यांनी जमिनीवर राहिला पाहिजे. मात्र काही जण टोकाची भूमिका घेतात, हवेत उडतात असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. याला आता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार टोला लगावला आहे.  आम्हाला आमची जमीन माहिती आहे, आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. नेमकं हवेत कोण आहे हे तपासलं पाहिजे असा टोला फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Politics, Sharad Pawar