राजकीय पिचवरचे 'मॅन ऑफ दि मॅच' क्रिकेटच्या मैदानात, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

राजकीय पिचवरचे 'मॅन ऑफ दि मॅच' क्रिकेटच्या मैदानात, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

काल पिंपरी चिंचवड़मध्ये एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घटना प्रसंगी अजित पवारांनी मारलेला हा शॉट चांगलाच व्हायरल होतोय.

  • Share this:

गोविंद गायकवाड, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 15 डिसेंबर : सध्या राजकीय पिचवर 'मॅन ऑफ दि मॅच' दिला जावा अशी खेळी खेळणारे अजित पवार क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी करताना दिसले. काल पिंपरी चिंचवड़मध्ये एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घटना प्रसंगी अजित पवारांनी मारलेला हा शॉट चांगलाच व्हायरल होतोय. अजित पवार नेहमीच त्यांच्या भाषणाच्या वेगळ्या शैलीमुळे चर्चेत असतात. सोमवारपासून नागपूरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आमदारांना दम देत शिस्तिचे धडे देताना दिसले.

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरचा राष्ट्रवादीचा हा पहिलाच कार्यकर्ता मेळावा होता. त्यात अजित पवार येणार असल्याने सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते अजित पवारांच्या भाषणाकडे त्यामुळे दादा काय बोलतात याची कार्यकर्ते वाट बघत होते. अजित पवारांनी फडणवीसांसोबत जात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल राष्ट्रवादीत वेगळं मत तयार झालं होतं. अजित पवार हे अतिशय स्पष्टवक्ते आणि थेट बोलतात त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांचं भाषण आवडतं.

इतर बातम्या - ज्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार झाला ती कुठे आहे? वाचा धक्कादायक सत्य

अजित पवार म्हणाले, सगळ्या आमदारांनी अधिवेशनात पूर्ण हजर राहावे, विशेषकरून दत्ता भरणेंनी यांची नोंद घ्यावी असंही त्यांनी सुनावलं. पहिल्या दिवसापासून सर्व आमदारांनी अधिवेशनाला उपस्थित रहायचं, पहिले दोन दिवस काही नसतं, नंतर काही नसतं, असं करून चालणार नाही. लग्न वगैरे दुसऱ्या कोणाला सांगा. सभागृहात उपस्थिती दिसली पाहिजे असं त्यांनी नव्या आणि जुन्या आमदारांना सुनावलं.

इतर बातम्या - मृत्यूच्या 50 वर्षांनंतरही ड्यूटीवर आहे सैनिकाचा आत्मा, महिन्याला मिळतो पगार

ते पुढे म्हणाले, महामंडळाचं पण वाटप होणार आहे, जे काम करणारे आहेत त्यांची नावे द्या, जिथं शक्य आहे तिथं त्या सगळ्यांना सामावून घेण्यात येईल. अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी भर सभेत अजित पवारांना तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी गळ घातली. कार्यकर्त्यांच्या या मागणीला दादांनी संयमाने उत्तर दिलं आणि तुमच्या भावना कळाल्या असं सांगत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमान बोलताना अजित पवार म्हणाले, डिसेंबर संपायच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. राष्ट्रवादीला सरकारमध्ये 15 मंत्रिपदं धरून 17 पदं मिळालीत. यावेळी नवीन खाती घेण्याचा प्रयत्न आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठीच अर्थ खातं राष्ट्रवादीकडे ठेवलं.

इतर बातम्या - ज्या आरोपीने निर्भयावर सगळ्यात जास्त अत्याचार केले, असं आहे त्याचं आयुष्य!

Published by: Renuka Dhaybar
First published: December 15, 2019, 1:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading