भाजप नेत्यांची सगळी अंडीपिल्ली मला माहीत आहेत - अजित पवार

भाजप नेत्यांची सगळी अंडीपिल्ली मला माहीत आहेत - अजित पवार

'भाजपमधील नेते मुलींना पळून नेण्याची भाषा करतात, शेतकऱ्यांना साले म्हणातात अशा नेत्यांनी बोलताना आत्मपरीक्षण केलं पाहिजे.' असं अजित पवार म्हणाले आहेत.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 03 एप्रिल : पुण्यामध्ये आयोजित सभेत अजित पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'जे लोक भाजपमध्ये गेले ते कशासाठी गेले, हे मी नाव घेऊन सांगेन' असं माजी मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 'मला सगळ्यांची अंडीपिल्ली माहीत आहेत' असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

'भाजपमधील नेते मुलींना पळून नेण्याची भाषा करतात, शेतकऱ्यांना साले म्हणातात अशा नेत्यांनी बोलताना आत्मपरीक्षण केलं पाहिजे.' असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, 'माझी चुक झाली. त्याबद्दल मी माफी मागितली आहे. पण बोलताना तोलून-मापून बोला' असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

तर 'काँग्रेसने दिलेले उमेदवार मोहन जोशी यांच्या मागे आम्ही सगळे ताकदीनं उभे आहोत' असंही पवार म्हणाले. आज सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं कौतूक केलं. 'देशात एक नंबरचं काम सुप्रियाचं' असं अजित पवार म्हणाले आहेत.

बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचे अर्ज भरला. यासाठी नरपतगिरी चौकात संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे, पार्थ पवार उपस्थित होते.

सुप्रिया सुळेंनी कॉन्सिल हॉलमध्ये अर्ज भरला. अर्ज भरायला जात असतानाच सुप्रिया सुळे स्टेजवरच अजित पवार यांच्या पाया पडल्या. त्यामुळे मोदींनी पवार कुटुंबाच्या कलहाच्या वक्तव्याला जाहीर छेद देण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.

VIDEO: 'पत्नीला न्याय दिला नाही, ते तुम्हाला काय न्याय देणार?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 01:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading