प्रशासनाच्या विरोधात 'पिंपरी'त विरोधकांनी महापालिकेतच घातली 'पंगत'!

प्रशासनाच्या विरोधात 'पिंपरी'त विरोधकांनी महापालिकेतच घातली 'पंगत'!

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी महापालिकेत आले होते. तेव्हा पालिकेच्या सभागृहातच त्यांची आणि पालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड 5 सप्टेंबर : विरोधीपक्ष आंदोलन करण्यासाठी कधी कुठली शक्कल लढवतील ते काही सांगता येत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये विरोधी पक्षांनी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी चक्क पालिकेच्या आवारातच खानावळ आंदोलन केलं आणि पानं वाढून जेवायला सुरुवीत केली. पालकमंत्री चंद्रकांच पाटील हे जेव्हा महापालिकेत आले तेव्हा त्यांना वेगळ्या पद्धतीने जेवायला का दिलं असा विरोधी पक्षांचा मुख्य आक्षेप होता. त्यामुळे त्यांनी हे खानावळ आंदोलन केलं.

दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी महापालिकेत आले होते. तेव्हा पालिकेच्या सभागृहातच त्यांची आणि पालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची  जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विरोधकांना सत्ताधाऱ्यांच्या खाण्याचा हा प्रकार आवडला नाही. हा प्रकार चुकीचा असून आयुक्त प्रशासकीय अधिकारी असताना देखील स्तत्ताधाऱ्यांची भलामण का करतात असा सवाल राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते सत्ता साने यांनी केलाय. या आंदोलनामुळे महापालिकेच्या आवारात गोंधळाच वातावरण निर्माण झालं.

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, 'अशी' होईल निवड

प्रियकराने केले प्रेयसीचा खून

प्रेमप्रकरणातून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीवर ब्लेडने वार करुन तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे बुधवारी (4 सप्टेंबर) सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. आरोपी श्रीराम गिरी हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

SPECIAL REPORT: हर्षवर्धन पाटील इंदापुरातूनच लढणार, पण भाजप की अपक्ष?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम सुग्रीव गिरी असे आरोपीचे नाव आहे. मावळ तालुक्यातील वडगाव येथील निसर्गवारा लॉजवर दोघे रूम क्रमांक 303 मध्ये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास थांबले होते. काही कारणावरून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. श्रीराम गिरी यांने त्याच्याकडील ब्लेडने प्रेयसीचा हात, गळा आणि पोटावर सपासप वार केले. अतिरक्तस्त्रावामुळे मुलीचा रूममध्येच मृत्यू झाला. घटनेनंतर आपोरीने तिथून पोबारा केला आहे. आरोपी घाईघाईत लॉजमधून जात असताना लॉजच्या एका कर्मचाऱ्याने त्याला हटकले. परंतु प्रेयसी तयारी करुन खाली येत असल्याचे सांगून त्याने दुचाकीवरुन पळ काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 02:53 PM IST

ताज्या बातम्या