पंतप्रधान मोदींनी केला कार्यक्रमात अचानक बदल, हॉस्पिटलमध्ये घेतली अरुण शौरींची भेट

पंतप्रधान मोदींनी केला कार्यक्रमात अचानक बदल, हॉस्पिटलमध्ये घेतली अरुण शौरींची भेट

राफेल प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मोदींच्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी सातत्याने टीका केली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे शौरींच्या भेटीला जाणं याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, पुणे 08 डिसेंबर : पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात होते. आज ही परिषद संपली. त्यानंतर पंतप्रधान नवी दिल्लीला रवाना होणार होते. मात्र पंतप्रधानांनी अचानक आपल्या कार्यक्रमात बदल केला आणि ते माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शहरातल्या रुबी हॉस्पीटलमध्ये गेले. तिथे त्यांनी शौरी यांची भेट घेतली आणि गप्पाही केल्या. त्याचे फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केलेत. घराच्या अंगणात फिरताना पडल्याने शौरींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना विख्यात पत्रकार असलेले अरुण शौरी यांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं होतं. वाजपेयींचं सरकार गेल्यानंतर त्यांचा भाजपशी संबंध तुटला होता. 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शौरींना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र त्यांना मोदींनी मंत्रिमंडळात घेतलं नाही. त्यानंतर शौरी आणि मोदी यांचे संबंध बिघडले होते.

त्यानंतर शौरींना नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका केली होती. राफेल प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मोदींच्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी सातत्याने टीका केली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे शौरींच्या भेटीला जाणं याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय.

अरूण शौरी हे गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला आहेत. आता ते राजकारणापासून दूर असले तरी केंद्र सरकारवर टीका मात्र ते करत असतात.

गेल्या काही वर्षांत त्यांची अनेक पुस्तकही प्रसिद्ध झाली आहेत. अरुण शौरी आणि मोदींची गेल्या 20 वर्षांपासून मैत्री आहे. यावेळी अरुण शौरी यांच्या भगिनी आणि पत्रकार नलिनी सिंह याही उपस्थित होत्या. अरुण शौरींच्या खोलीत प्रवेश करताच मोदी त्यांना म्हणाले, अरुणजी तुम्ही बसा, आराम करा. पण शौरींनी त्यांचं उभं राहून स्वागत केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2019 10:36 PM IST

ताज्या बातम्या